Join us

शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही फुटीची चिन्हे? अध्यक्ष निवडीच्या मतदानाला या पाच आमदारांची दांडी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 11:32 AM

Maharashtra Assembly Speaker Election: काल झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर विजयी झाले होते. त्या निवडणुकीत महाविकास आघाडीची मते मोठ्या प्रमाणात फुटल्याचे दिसून आले होते. त्यात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी भाजपच्या उमेदवाराल मतदान केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मतदारांनीही मतदानाला दांडी मारल्याने चर्चांना उधाण आले होते.

मुंबई - शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीमुळे राज्यात सत्तांतर होऊन एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले आहे. दरम्यान, राज्यपालांनी दिलेल्या आदेशानुसार बहुमत सिद्ध करण्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. दरम्यान, काल झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर विजयी झाले होते. त्या निवडणुकीत महाविकास आघाडीची मते मोठ्या प्रमाणात फुटल्याचे दिसून आले होते. त्यात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी भाजपच्या उमेदवाराल मतदान केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मतदारांनीही मतदानाला दांडी मारल्याने चर्चांना उधाण आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४६ आमदारांनी मतदान केले. तर सात आमदार विविध कारणांमुळे मतदानाला उपस्थित राहू शकले नव्हते. यातील अनिल देशमुख आणि नवाब मलिक ते तुरुंगात आहेत. मात्र इतर आमदारांच्या अनुपस्थितीमुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्याव्यतिरिक्त दत्तात्रेय भरणे, बबन शिंदे, निलेश लंके, दिलीप मोहिते आण अण्णा बनसोडे हे आमदार विधान सभा अध्यक्षांच्या निवडणुकीला अनुपस्थित होते. त्यापैकी दत्तात्रेय भरणे हे आईच्या निधनामुळे येऊ शकले नाहीत. तर दिलीम मोहिते आणि अण्णा बनसोडे हे उशिरा आल्याने मतदान करू शकले नाहीत. तर निलेश लंके हे आजारी असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, आज विश्वास प्रस्तावावेळी हे आमदार काय भूमिका घेतात. याकडे सर्वांचं लक्ष असेल.  

टॅग्स :शरद पवारविधानसभानिवडणूकराष्ट्रवादी काँग्रेस