Join us

सिमरनने सार्थ ठरवला पालकांचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 6:13 AM

रुईया महाविद्यालयात शिकणाऱ्या आणि अंध असणाºया सिमरनने ८९ टक्के गुण मिळवून आपल्या आईवडिलांचा विश्वास सार्थ ठरवला आहे.

मुंबई : रुईया महाविद्यालयात शिकणाऱ्या आणि अंध असणाºया सिमरनने ८९ टक्के गुण मिळवून आपल्या आईवडिलांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. कला शाखेत सिमरनने हे गुण मिळविले आहेत. विशेष म्हणजे परीक्षा देताना महाविद्यालयाने पुरविलेल्या संगणकावर रायटरची मदत न घेता सिमरनने ही परीक्षा दिली. संगणकावर उपलब्ध स्क्रीन रीडर सॉफ्टवेअरचा वापर करत आणि रीडरची मदत घेत सिमरनने प्रश्नपत्रिकेतील प्रश्न जाणून घेतले. त्यानंतर टाईप केलेल्या उत्तरांची प्रिंट आउट काढत उत्तरपत्रिका जमा केल्या. सिमरनला भविष्यात सायकोलॉजी किंवा संस्कृत विषयात करिअर घडविण्याची इच्छा असल्याची प्रतिक्रिया तिने दिली. संस्कृत आणि सायकोलॉजी विषयांत तिला प्रत्येकी सगळ्यांत जास्त म्हणजे ९४ गुण मिळाले आहेत.