सरकार कधीपासून इतिहास संशोधक बनले; संजय राऊतांचा वाघनखांवरून फसवणुकीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 09:40 AM2023-10-09T09:40:14+5:302023-10-09T09:40:46+5:30

वाघ नखांच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्हाला आशीर्वाद आहेत, असे होर्डिंग भाजपने २०१४ मध्ये लावले होते.

Since when did Sarkar become a historian; Sanjay Raut's Allegation of fraud by Vaghankha | सरकार कधीपासून इतिहास संशोधक बनले; संजय राऊतांचा वाघनखांवरून फसवणुकीचा आरोप

सरकार कधीपासून इतिहास संशोधक बनले; संजय राऊतांचा वाघनखांवरून फसवणुकीचा आरोप

googlenewsNext

मुंबई :  छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे भारतात आणण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नांवर शिवसेना ठाकरे गटाने रविवारी पुन्हा टीकेची झोड उठवली. लंडन येथील वस्तुसंग्रहालयातील वाघनखे शिवरायांची असल्याचा पुरावा नाही. त्यामुळे या म्युझियममधील वाघनखे शिवरायांची असल्याचा सरकारचा दावा म्हणजे फसवणूक आहे. सरकार कधीपासून इतिहास संशोधक झाले, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली
राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत लंडन येथील व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमसोबत वाघनखांबाबत सामंजस्य करार करण्यात आला.

 काय म्हणाले संजय राऊत?  
- वाघ नखांच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्हाला आशीर्वाद आहेत, असे होर्डिंग भाजपने २०१४ मध्ये लावले होते.
- आता तो प्रकार वाघनखांपर्यंत येऊन पोहोचला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे समुद्रातील स्मारक तसेच राहिले आहे. 
- मात्र, आता निवडणुकीसाठी हे असे भावनिक मुद्दे आणले जात आहेत, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

Web Title: Since when did Sarkar become a historian; Sanjay Raut's Allegation of fraud by Vaghankha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.