Join us

चतुरस्त्र गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांना एकता कला गौरव पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 17:34 IST

ज्येष्ठ नाट्य अभिनेते अशोक समेळ यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन झाले.

श्रीकांत जाधव

भावस्पर्शी संगिताने रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या चतुरस्त्र गायिका व संगीतकार पद्मश्री पद्मजा फेणाणी- जोगळेकर यांना या वर्षाचा 'एकता कला गौरव पुरस्कार' देऊन सन्मान करण्यात आला. अभिजित राणे, अशोक लोटणकर, प्रतिभा सराफ, श्रीकांत जाधव,  अनिल कदम, वैशंपायन गमरे, किरण आव्हाड, रामचंद्र के यांनाही 'एकता'च्या अन्य पुरस्करांनी गौरविण्यात आले. 

ज्येष्ठ नाट्य अभिनेते अशोक समेळ यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन झाले. 'एकता'चे अध्यक्ष कवी प्रकाश ग. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभास कवी भगवान निळे, चित्रकार प्रदीप म्हपसेकर, अभिनेते अनिल गवस, नृत्य दिग्दर्शक अनिल सुतार, महेश दवंडे, चित्रकार भगवान दास आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होते.  यावेळी मान्यवरांच्या हस्ते  नृत्य, अभिनय, काव्य स्पर्धातील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

सूत्रसंचालन प्रा. अवधूत भिसे यांनी केले अशी माहिती संस्थेचे सचिव प्रकाश पाटील व उपाध्यक्ष उज्जय आंबेकर यांनी दिली. यावेळी संगीतकार अभिजित राणे कवी अशोक लोटणकर, कवयित्री प्रतिभा सराफ, पत्रकार श्रीकांत जाधव, लोककला कलावंत वैशंपायन गमरे,  गुन्हा अन्वेषणचे किरण आव्हाड, सांस्कृतिक कला आयोजक रामचंद्र के. यांना  गौरविण्यात आले.