एकलारे वीज समस्येपासून मुक्त

By Admin | Published: May 23, 2014 03:20 AM2014-05-23T03:20:36+5:302014-05-23T03:20:36+5:30

तारापूर एमआयडीसीपासून काही कि.मी. अंतरावर असलेल्या कुंभवली गावाजवळील एकलारे गावात स्वतंत्र रोहित्र बसवण्यात आल्यामुळे गावातील ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.

Single-free power problem | एकलारे वीज समस्येपासून मुक्त

एकलारे वीज समस्येपासून मुक्त

googlenewsNext

बोईसर : तारापूर एमआयडीसीपासून काही कि.मी. अंतरावर असलेल्या कुंभवली गावाजवळील एकलारे गावात स्वतंत्र रोहित्र बसवण्यात आल्यामुळे गावातील ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे. सतत खंडित होत असलेल्या वीजपुरवठ्यामुळे या गावातील ग्रामस्थ अनेक वर्षे त्रस्त होते. या निर्णयामुळे हा गाव त्रासमुक्त झाला आहे. कुंभवली ग्रामपंचायतीच्या प्रयत्नाने एकलारे गावात १०० केव्ही क्षमतेचे रोहित्र बसविण्यात आले आहे, तसेच कुंभवली गावापासून ते मुरबे या गावापर्यंत २ ते ३ किमी लांबीची उच्च दाब वाहिनी नव्याने टाकण्यात आली आहे. महावितरणने केलेल्या या उपाययोजनेमुळे नवीन कुंभवली, गुंदवली, एकलारे व मुरबे इ. गावांना अखंडित वीजपुरवठा होणार आहे. या रोहित्राचे उद्घाटन कुंभवलीच्या सरपंच तृप्ती संखे यांच्या हस्ते केले. यावेळी मनसेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे, उपसरपंच विजय पिंपळे, ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Single-free power problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.