लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कुलाबा-अंधेरी-सीप्झ या पहिल्यावहिल्या भुयारी मेट्रो-३च्या आरेमधील कारशेडसाठी आता गोरेगाव येथील जागेचा विचार केला जात असतानाच दुसरीकडे मेट्रो-६साठीही याच जागेचा कारशेड म्हणून विचार करता येईल का? याबाबत खलबते सुरू झाली आहेत.
मुळात गोरेगाव येथील जागेबाबतही अद्याप अस्पष्टता असून, ना विकास क्षेत्र आणि रहिवासी क्षेत्राबाबत गोंधळ मिटल्यानंतर मेट्रोच्या कारशेडचा पेच सुटणार आहे. दरम्यान, कारशेडचा मुद्दा दिवसागणिक लांबणीवरच पडत असून, होत असलेल्या विलंबामुळे साहजिकच प्रकल्प खर्चात वाढ होण्याची चिन्हे आहेत. सूत्रांकडील माहितीनुसार, गोरगाव पहाडी येथील जागेवर मेट्रो-३ आणि ६च्या एकच कारशेडबाबत अभ्यास सुरू आहे.
येथील जागा मोक्याची असली तरी विलंबामुळे याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही कधी होईल, हे मात्र अस्पष्ट आहे. मुळातच मेट्रो-३ ही २०२१मध्ये रुळावर येईल, असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र अडथळ्यांमुळे यास २ वर्षांचा विलंब होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.मेट्रो-३अंतर्गत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे सोमवारी सीएसआयए टी-१ (आंतरदेशीय विमानतळ) स्थानक येथे भुयारीकरणाचा३१वा टप्पा पार पडला असून, प्रकल्पाचे आतापर्यंत ८७ टक्के भुयारीकरण व ६० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे.
सध्या एकूण ७ टीबीएमद्वारे विविध भागात भुयारीकरण सुरू असून येत्या काही महिन्यात आणखी काही भुयारीकरणाचे टप्पे पूर्ण होणे अपेक्षित आहे.कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबईच्या वाहतुकीचे चित्र बदलू शकतो. ३३.५ कि.मी. लांबीचा हा मार्ग रेल्वेमधील गर्दी कमी करू शकतो. रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवू शकतो. सुमारे १६ लाख रेल्वे प्रवाशांना वातानुकूलित डब्यातून प्रवास करणे शक्य होईल. मुंबईतील ६ महत्त्वपूर्ण व्यावसायिक केंद्रांशी, ३० शैक्षणिक संस्था, ३० मनोरंजनाची ठिकाणे यांना हा मार्ग जोडला जाईल.कांजुरमार्ग समर्थनगर-जे.व्ही.एल.आर-सीप्झ-कांजुरमार्ग-विक्रोळी आतापर्यंतची कामे टक्क्यांत