Join us

बिग बी अमिताभ बच्चन यांच्याकडून सायन रुग्णालयाला मिळाले व्हेंटिलेटर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 7:39 AM

देणगी स्वरूपात दिली पावणेदाेन काेटी रुपयांची यंत्रसामग्री

मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ‘क्लास – १’ प्रकारातील दोन अत्याधुनिक अतिदक्षता व्हेंटिलेटर्स महापालिकेच्या सायन रुग्णालयाला नुकतेच दिले. त्याचबरोबर मॉनिटर्स, सीआर्म ईमेज इन्टेन्सीफायर, इन्फ्युजन पंप असे सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचे यंत्रसामग्री देणगी स्वरुपात रुग्णालयास दिली.

सायन रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागात दोन्ही व्हेंटिलेटर्स कार्यान्वित करण्यात आले आहेत. या अत्याधुनिक व्हेंटिलेटर्सद्वारे गेल्या काही दिवसांत सुमारे ३० गरजू रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यात आले. ऑक्सिजन पातळी खालावलेल्या किंवा ज्यांना श्वास घेण्यास अडचणी येत आहेत, अशा रुग्णांना या यंत्राद्वारे ऑक्सिजन देता येते.

या व्हेंटिलेटर्सद्वारे गरजू रुग्णांना शंभर टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन देण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्याचबरोबर ऑक्सिजनचा दाब आवश्यकतेनुसार कमी-जास्त करण्याची व्यवस्था आहे. यासाेबतच नळीद्वारे थेट फुप्फुसांपर्यंत ऑक्सिजन देण्याची सुविधाही यात आहे. याशिवाय याद्वारे ‘नॉन इन्व्हेझिव्ह मास्क’ पद्धतीने ऑक्सिजन देता येताे, अशी माहिती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.

टॅग्स :अमिताभ बच्चनहॉस्पिटल