सर जे.जे. कला आणि वास्तुशास्त्र महाविद्यालयास अभिमत विद्यापीठाचा दर्जा - चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 08:54 AM2023-06-29T08:54:57+5:302023-06-29T08:56:41+5:30

या विद्यापीठासाठी ५० कोटी ३७ लाख ९० हजार ८०० अशा वेतन व इतर अत्यावश्यक खर्चास देखील मान्यता देण्यात आली, असेही चंद्रकांत पाटील  यांनी सांगितले.

Sir J.J. College of Arts and Architecture is now accredited with university status - Chandrakant Patil | सर जे.जे. कला आणि वास्तुशास्त्र महाविद्यालयास अभिमत विद्यापीठाचा दर्जा - चंद्रकांत पाटील

सर जे.जे. कला आणि वास्तुशास्त्र महाविद्यालयास अभिमत विद्यापीठाचा दर्जा - चंद्रकांत पाटील

googlenewsNext

मुंबई : मुंबईतील सर जे.जे. कला महाविद्यालय, उपयोजित कला महाविद्यालय आणि वास्तुशास्त्र महाविद्यालय अशा तीनही शासकीय महाविद्यालयांचे मिळून डी-नोव्हो प्रकारांतर्गत अभिमत विद्यापीठ स्थापन करण्यास बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

या महाविद्यालयात वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम पाहता येथील शिक्षणाचा विकास करून त्याचा लाभ विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून दि.१९ मार्च २०२० विद्यापीठ अनुदान आयोगास कला संचालनालयाकडून प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार इरादापत्र प्राप्त झाले असून, अशा प्रकारचे देशातील पहिलेच अभिमत विद्यापीठ असणार आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

या संदर्भामध्ये मुंबई विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉ. विजय जोशी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सने आपला अहवाल सादर केला होता. या विद्यापीठासाठी ५० कोटी ३७ लाख ९० हजार ८०० अशा वेतन व इतर अत्यावश्यक खर्चास देखील मान्यता देण्यात आली, असेही चंद्रकांत पाटील  यांनी सांगितले.

Web Title: Sir J.J. College of Arts and Architecture is now accredited with university status - Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.