Join us

पाण्याची अशी काटकसर तुम्ही करून दाखवा साहेब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2023 9:30 AM

मुंबईची लोकसंख्या दिवसागणिक वाढत असून, वाढती लोकसंख्या पाहता मुंबईला किमान ५ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठ्याची गरज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईमध्ये गगनचुंबी इमारतींना हवे तसे पाणी मिळत असले तरी आजही गोवंडी, मानखुर्द, धारावी, कुर्ला, मालवणी आणि मालाडसह कित्येक झोपड्यांत पाण्याची विदारक अवस्था आहे. काही ठिकाणी पाणी विकत घ्यावे लागते तर काही ठिकाणी साठवून पाणी वापरावे लागते. त्यामुळे मुंबईकरांना आजही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष द्यावे, असा सूर नागरिक लावत आहेत.

मुंबईची लोकसंख्या दिवसागणिक वाढत असून, वाढती लोकसंख्या पाहता मुंबईला किमान ५ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठ्याची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र मुंबईला प्रतिदिन ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. त्यामुळे मुंबईला आणखी किमान १ हजार दशलक्ष लिटर एवढ्या पाण्याची आवश्यकता आहे. 

१,४४,७३६.३ कोटी लिटर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता (१४,४७,३६३ दशलक्ष लिटर) आहे.

४,४५० दशलक्ष लिटर मुंबईची पाण्याची दररोजची मागणी आहे.

४.२५रुपयांमध्ये मुंबईला हजार लीटर पाणी मिळते. महापालिका याकरिता १२ ते १५ रुपये खर्च करते.

पाणीपुरवठा असलेल्या जलस्रोतातून दररोज जवळपास ४०० किलोमीटर लांबीच्या जाळ्याद्वारे पाणी  जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत वाहून आणले जाते.

असे केले जाते वितरण पाणी शुद्धीकरण झाल्यानंतर हे पाणी भांडुप जलशुद्धीकरण केंद्र, पांजरापूर येथे साठविले जाते. २७ जलाशयांमार्फत त्यानंतर पाण्याचे शहर आणि उपनगरांत वितरण केले जाते.

१५० लिटर हवे पाणीn पाणीपुरवठा करणारी यंत्रणा १८४५ पासून अस्तित्वातn गळतीचे प्रमाण २५ ते ४० टक्केn ८६२ ते १३०० दशलक्ष लिटर पाणी गळतीमुळे वायाn प्रत्येक व्यक्तीला १५० लिटर पाण्याची गरजn झोपड्यांमध्ये दर माणसी दररोज ४० लिटरपेक्षाही कमी पाणी मिळतेn प्रत्यक्षात मात्र रोज प्रतिव्यक्ती १३० लीटर पुरविण्याचे धोरण

टॅग्स :पाणीकपात