Amruta Fadnavis: 'सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है', अमृता फडणवीसांचं नवं ट्विट; ठाकरे सरकारवर निशाणा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 05:14 PM2021-04-10T17:14:41+5:302021-04-10T17:15:40+5:30
राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) आता आणखी एका ट्विटमुळे चर्चेत आल्या आहेत.
Amruta Fadnavis tweet: राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियात चांगल्या सक्रिय असतात. त्यांच्या ट्विटसची जोरदार चर्चा देखील होते आणि राजकारणाशी जरी त्यांचा थेट संबंध नसला तरी त्या राजकीय भूमिकांवर भाष्य करुन सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात. आता आणखी एका ट्विटमुळे अमृता फडणवीस चर्चेत आल्या आहेत. (sirf kuch daag acche lagte hai amruta fadnavis new tweet goes viral on social media)
अमृता फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर त्यांचा एक फोटो ट्विट केलाय. या फोटोत त्यांच्या चेहऱ्यावर केक लावण्यात आला आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये "सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है", असं लिहीलं आहे.
Thank you so much for all your lovely birthday wishes !
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) April 10, 2021
सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है ! pic.twitter.com/Oqeg9jBi7z
अमृता फडणवीस यांचा ९ एप्रिल रोजी वाढदिवस होता. या निमित्तानं त्यांना अनेकांनी शुभेच्छा देखील दिल्या. चाहते आणि शुभचिंतकांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल अमृता फडणवीस यांनी आभार व्यक्त केले आहेत. यावेळी अमृता यांनी वाढदिवसाचं सेलिब्रेशन करताना त्यांच्या चेहऱ्यावर लावण्यात आलेल्या केकचा फोटो ट्विट केला आहे. पण त्यांनी फोटो ट्विट करताना लिहिलेल्या कॅप्शनची ट्विटरवर जोरदार चर्चा होत आहे. 'सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है', असं म्हणत अमृता यांनी ठाकरे सरकारवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.
अमृता फडणवीस यांनी याआधी राज्य सरकार आणि विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा यावरुन राजकीय वातावरण तापलेलं असताना अमृता यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता हिंदीत निशाणा साधला होता. "पहचान कौन? एक राजा जो- महल की चौखट से निकलता नही अवाम से कभी मिलता नही सत्य और कर्म की राह पर चलता नही वसूली के बिन उसका पत्त्ता हिलता नही महामारी का कहर उससे सम्हलता नही प्रगति का फूल उसकी छाया में खिलता नही ! सच है, धोखा कभी फलता नही। क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?", असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं होतं.