पैशांसाठी बहिणीला ढकलले वेश्याव्यवसायात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 02:34 AM2018-03-14T02:34:33+5:302018-03-14T02:34:33+5:30

नोकरीचे आमिष दाखवून लहान बहिणीला वेश्याव्यवसायात ढकलल्याचा प्रकार अ‍ॅण्टॉप हिलमध्ये उघडकीस आला.

The sister pushed the sister to the prostitution business | पैशांसाठी बहिणीला ढकलले वेश्याव्यवसायात

पैशांसाठी बहिणीला ढकलले वेश्याव्यवसायात

Next

मुंबई : नोकरीचे आमिष दाखवून लहान बहिणीला वेश्याव्यवसायात ढकलल्याचा प्रकार अ‍ॅण्टॉप हिलमध्ये उघडकीस आला. नोकरीच्या बहाण्याने तरुणीला मित्राच्या घरी नेले. तेथे थंडपेयात गुंगीचे औषध टाकून तिच्यावर बलात्कार केला आणि तोच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला वेश्याव्यवसायात ढकलले. व्हिडीओ व्हायरल झाल्याचे समजताच तिने अ‍ॅण्टॉप हिल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तरुणीच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.
तक्रारदार नेहा (नावात बदल) वडाळा परिसरात बहिणीसोबत राहते. गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात बहिणीने तिला तिचा मित्र बँकेत नोकरी लावणार असल्याचे आमिष दाखवले. नेहाही तयार झाली. तिच्या बहिणीने तिला तरबेज शेखच्या (३०) घरी नेले. नोकरीची चर्चा झाल्यानंतर तेथे तिला थंडपेयात गुंगीचे औषध दिले आणि तरबेजने तिच्यावर बलात्कार केला. बहिणीने याचा व्हिडीओ काढला. दोन तासांनी नेहा शुद्धीवर येताच तिला आपल्यासोबत काही तरी चुकीचे झाल्याचे जाणवले. तिने याबाबत बहिणीला विचारताच तिने तिच्या बलात्काराचा व्हिडीओ तिला दाखवला.
हाच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरबेज तिच्यावर अत्याचार करत होता. फेब्रुवारीमध्ये नेहाने ही बाब बहिणीच्या पतीला सांगितली. त्याने पत्नीला खडसावले. याच रागात बहिणीने तो व्हिडीओ व्हायरल केला. २८ फेब्रुवारी रोजी ही बाब नेहाला समजली. तिने याबाबत अ‍ॅण्टॉप हिल पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास
सुरू केला आहे. या प्रकरणी मंगळवारी बहिणीसह तरबेजला अटक केली आहे. या प्रकरणातील अन्य साथीदाराचा शोध सुरू असून
त्यालाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: The sister pushed the sister to the prostitution business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.