मुंबई : अवघ्या दोन लाख रूपयांसाठी अल्पवयीन बहिणीच्या लग्नाचा घाट घालणाऱ्या बहिणीसह तिचा नवरा आणि ४९ वर्षीय आरोपीविरुद्ध मानखुर्द पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी मानखुर्द पोलीस अधिक तपास करत आहे.मानखुर्द परिसरात १६ वर्षीय मुलगी मोठी बहीण, भाऊजीसोबत राहते. याच दरम्यान मोठ्या बहिणीची एका ४९ वर्षीय व्यावसायिकासोबत ओळख झाली. त्याचा भाजीविक्रीचा व्यवसाय आहे. त्याने लग्नासाठी मुलगी बघत असल्याचे सांगितले. तसेच जिच्याशी लग्न होईल त्यांच्या कुटुंबीयांना २ लाख देणार असल्याचे आमिष दाखवले.पैशांबाबत समजताच बहिणीसह भाऊजीची नियत फिरली. त्यांनी परस्पर लहान बहिणीचा व्यवहार केला.व्यापाºयाने मुलीला भेटायचे असल्याचे सांगून तिला सोबत घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार व्यापाºयाने सांगितलेल्या ठिकाणी दोघीही पोहोचल्या. तिथे एकांतात बोलायचे असल्याचे सांगून, व्यापारी अल्पवयीन मुलीला घेऊन एका खोलीत गेला. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तेथे तिला बहिणीबाबत समजले.मुलीने त्याच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर घडलेला प्रकार आईला सांगितला. याबाबत अनभिज्ञ असलेल्या आईलाही धक्का बसला. तिने रविवारी मानखुर्द पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी बहीण, तिचा नवरा आणि व्यापाºयाविरुद्ध गुन्हा नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे.
बहिणीकडूनच लहान बहिणीच्या लग्नाचा घाट, पोलिसांत गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 2:02 AM