मुंबई : आयआयटी, पवई येथे आत्महत्या केलेल्या दर्शन सोलंकीने मृत्युपूर्वी लिहिलेली सुसाइड नोट या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) शोधून काढली. सोलंकीने फेब्रुवारीत आत्महत्या केली होती. सोलंकीने अन्य विद्यार्थ्यांनी त्रास आणि धमक्या दिल्याचा आरोप केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
मुंबईपोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाने (एसआयटी) करत आहेत. एसआयटीला सोलंकीच्या खोलीत एक सुसाइड नोट सापडली आहे, ज्यात सोलंकीने त्याच्या एका सहविद्यार्थ्याचे नाव लिहीत त्रास आणि धमक्यांसाठी त्याला कारणीभूत ठरविल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सुसाइड नोटमध्ये ‘अरमानने मला मारले आहे’ असे त्याने म्हटले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सोलंकी याला अरमान इक्बाल खत्री नावाचा वर्गमित्र त्रास देत होता आणि धमकावत होता. त्यांना दोघांमधील काही व्हॉट्सॲप चॅटही सापडले आहेत. त्यामुळे त्या दिवशी काहीतरी नक्कीच घडले असावे, असा तपास अधिकाऱ्यांना संशय आहे. आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे आणि ॲट्रॉसिटी कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्ह्याची नोंदणी सुरू असल्याचेही सूत्रांनी नमूद केले. आयआयटी पॅनेलने यापूर्वीच्या निष्कर्षांमध्ये कोणत्याही जाती-आधारित भेदभावाचा इन्कार केला होता आणि दावा केला होता.