एसटीत बसा, सीट मागे करून आरामदायी प्रवास करा; लालपरी नव्या लूकमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 12:09 PM2023-03-31T12:09:45+5:302023-03-31T12:10:48+5:30

बीएस-६ मॉडेलच्या या नव्या बसमध्ये आरामदायक प्रवासाचा अनुभव प्रवासी घेऊ शकणार आहेत.

Sit in the ST, recline the seat for a comfortable ride; Lalpari in a new look | एसटीत बसा, सीट मागे करून आरामदायी प्रवास करा; लालपरी नव्या लूकमध्ये

एसटीत बसा, सीट मागे करून आरामदायी प्रवास करा; लालपरी नव्या लूकमध्ये

googlenewsNext

मुंबई : एसटी महामंडळाची लालपरी आता लवकरच नव्या आकर्षक लूकमध्ये नजरेस येणार आहे. महामंडळाने तशी तयारी केल्यामुळे एसटीच्या लक्झरी बस या महिन्यातच विविध मार्गावर धावताना बघायला मिळणार आहेत. 

बीएस-६ मॉडेलच्या या नव्या बसमध्ये आरामदायक प्रवासाचा अनुभव प्रवासी घेऊ शकणार आहेत. विशेष म्हणजे, आधुनिक बनावटीच्या या बसमध्ये वेळोवेळी उद्घोषणा होणार असल्याने प्रवाशांना वेळोवेळी माहिती मिळणार आहे. चालक प्रवाशांसोबत माईक सिस्टमवरून संपर्कात राहणार आहे. राज्यात अशा प्रकारच्या ७०० बस आणण्याचेे महामंडळाचे लक्ष्य आहे. मुंबई, नागपूरसह पुणे आणि औरंगाबादमध्येही अशा प्रकारच्या बस बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या मते  लवकरच बस उपलब्ध होणार आहेत.

आरामदायक प्रवास

बसमध्ये विशिष्ट प्रकारच्या स्टीलचा वापर करण्यात आल्याने ही बस लालपरीच्या तुलनेत अधिक मजबूत राहणार आहे. बसमध्ये दोन बाय दोनच्या ४४ तसेच चालक, वाहकांसाठी वेगळ्या दोन अशा एकूण ४६ सीटची व्यवस्था करण्यात आली आहे. सीट मागे पुढे करता येणार आहे. प्रवाशांना सामान ठेवण्यासाठी वेगळी व्यवस्था राहणार आहे. खिडकीची व्यवस्थाही वेगळी केल्याने प्रवाशांना निसर्गरम्य नजारा बघता येणार आहे.

बसला सॅटेलाइट सेंट्रल सर्व्हर जोडले जाणार असून, व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम लावण्यात येणार असल्यामुळे बसच्या लोकेशनची माहितीही प्रवाशांना मिळणार आहे. या सुविधेमुळे बसमधील प्रवाशांना आपत्कालीन स्थितीत तत्काळ मदत उपलब्ध होऊ शकणार आहे.

Web Title: Sit in the ST, recline the seat for a comfortable ride; Lalpari in a new look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.