Join us

राजनसाठी एसआयटी

By admin | Published: October 30, 2015 12:52 AM

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन भारतात आल्यानंतर त्याच्यावर हल्ला करण्याचा दाऊदच्या जवळच्या सहकाऱ्यांचा कट आहे का हे बघण्यासाठी पोलीस आता पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळमधून येणाऱ्या फोनवर लक्ष ठेवून आहेत.

डिप्पी वांकाणी, मुंबईअंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन भारतात आल्यानंतर त्याच्यावर हल्ला करण्याचा दाऊदच्या जवळच्या सहकाऱ्यांचा कट आहे का हे बघण्यासाठी पोलीस आता पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळमधून येणाऱ्या फोनवर लक्ष ठेवून आहेत. राजनच्या चौकशीसाठी मुंबई पोलीस विशेष तपास पथक (एसआयटी) तयार करणार आहेत. त्यात गुन्हे शाखेचे अधिकारी आणि गुन्हेगारी जगतातील व्यवहारांची माहिती असलेल्या विशेष तज्ज्ञांचा आणि स्थानिक पोलीस विभागात बदली करण्यात आलेल्यांचा समावेश असेल. मुंबई पोलिसांच्या मुख्यालयातील गुन्हे शाखेच्या कोठडीत छोटा राजनला ठेवले जाईल. या कोठडीत पूर्वी डॉन अरुण गवळी व २६/११ हल्ल्यातील दोषी अजमल कसाब याला ठेवण्यात आले होते. नेपाळ, पाकिस्तान व बांगलादेशातून येत असलेल्या फोन कॉल्सची छाननी केली जात आहे. कॉल्समधील काही महत्त्वाचे शब्द जुळत असतील तर ते कॉल्स पुढे जाऊ दिले जात (इंटरसेप्ट) नाहीत. राजनवर दाऊदची टोळी कोणत्याही प्रकारचा हल्ला करण्याचा कट आखत असल्यास तो रोखण्याचे काम आम्हाला करायचे आहे, असे भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. छोटा शकीलने राजनला आॅस्ट्रेलियात ठार मारण्यासाठी आपले हस्तक पाठविले होते व त्याने राजनला भारतात आणल्यानंतरही ठार मारण्याचे जाहीर केले आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार एसआयटी स्थापन करण्याचा त्यांचा विचार आहे. छोटा राजनची चौकशी त्याच्या विदेशातील धंद्यांबद्दल केली जाईल, असे आणखी एका सूत्रांनी सांगितले. राजनने केलेली गुंतवणूक आणि त्याचे धंदे हे मलेशिया, इंडोनेशिया, चीन, सिंगापूर, झिम्बाब्वेमध्ये आहे. एकदा त्याने त्यांचा तपशील दिला की आम्ही सक्त वसुली संचालनालयाला पत्र लिहून त्यातील हवाला व्यवहारांची बाजू तपासण्यास सांगू, असे त्यांनी सांगितले. राजनला नेमके कुठे ठेवणार ही उत्सुकता संपली आहे. युनिट एकनजीकच्या कोठडीत त्याला ठेवले जाईल. तेथे अजमल कसाब आणि अरुण गवळीला ठेवण्यात आले होते, असे हा अधिकारी म्हणाला.अंडरवर्ल्डमधील व्यवहारांची चांगली माहिती असलेल्या परंतु स्थानिक अधिकाऱ्यांचा पथकात समावेश असेल. नुकतीच गुन्हे शाखेच्या ३७ अधिकाऱ्यांची स्थानिक पोलीस ठाण्यांत बदली करण्यात आली आहे. या नियोजित पथकात गुन्हे शाखेचे अधिकारी आणि पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल. निवडायचे अधिकारी नेमके कोणत्या कामात तज्ज्ञ आहेत हे बघून त्यांची निवड केली जाईल, असे एक अधिकारी म्हणाला.