राज्याच्या मुख्य सचिवपदी सीताराम कुंटे, जाणून घ्या कोण आहेत ते? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 06:36 PM2021-02-27T18:36:30+5:302021-02-27T18:38:23+5:30

अजय मेहता यांचा मुख्य सचिवपदाचा कार्यकाळ ३० जून रोजी संपल्यानंतर संजय कुमार हे राज्याचे मुख्य सचिव बनले होते.

Sitaram Kunte as the Chief Secretary of the state, find out who they are. | राज्याच्या मुख्य सचिवपदी सीताराम कुंटे, जाणून घ्या कोण आहेत ते? 

राज्याच्या मुख्य सचिवपदी सीताराम कुंटे, जाणून घ्या कोण आहेत ते? 

Next
ठळक मुद्देमेहता यांच्या निवृत्तीनंतर सेवाज्येष्ठतेनुसार तीन अधिकारी मुख्य सचिवपदाच्या स्पर्धेत होते. त्यावेळी, संजय कुमार यांना जबाबदारी देण्यात आली होती.

मुंबई - राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार हे सेवानिवृत्त झाल्यानंतर अतिरिक्त मुख्य सचिवपदी सीताराम कुंटे यांना संधी मिळाली आहे. सध्या संयुक्त राष्ट्रसंघात प्रतिनियुक्तीवर गेलेले प्रवीणसिंह परदेशी आणि सिताराम कुंटे यांच्यात मुख्य सचिवपदासाठी चुरस होती. त्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू होते. अखेर, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असलेल्या सिताराम कुंटे यांची या पदासाठी वर्णी लागली आहे. त्यांच्या जागी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी मनुकुमार श्रीवास्तव यांना संधी मिळाली आहे. दरम्यान, येत्या नोव्हेंबरमध्ये कुंटे निवृत्त होणार आहेत. त्यामुळे, नवीन मुख्य सचिवपदाचा कार्यकाळ हा नऊ महिन्यांचा असणार आहे. 

अजय मेहता यांचा मुख्य सचिवपदाचा कार्यकाळ ३० जून रोजी संपल्यानंतर संजय कुमार हे राज्याचे मुख्य सचिव बनले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खास मर्जीतील असलेल्या मेहता यांना मुदतवाढ मिळणार असल्याची चर्चा होती. पण, त्यांच्या कार्यपद्धतीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची खप्पामर्जी होती. त्यामुळे त्यांना पुन्हा मुदतवाढ देण्यास महाविकास आघाडीतील काही मंत्र्यांचा कडाडून विरोध केला. 

मेहता यांच्या निवृत्तीनंतर सेवाज्येष्ठतेनुसार तीन अधिकारी मुख्य सचिवपदाच्या स्पर्धेत होते. त्यावेळी, संजय कुमार यांना जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार फेब्रुवारी, २०२१मध्ये निवृत्त होत असल्याने त्यांचे नाव स्पर्धेत होते. त्याचबरोबर सध्या सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव असलेले सन १९८५च्या बॅचचे सीताराम कुंटे हेही स्पर्धेत होते. कुंटे नोव्हेंबर, २०२१मध्ये निवृत्त होत आहेत. नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रविण परदेशी यांच्याही नावाची चर्चा होती. ते सन १९८५च्या बॅचचे असून, तेही नोव्हेंबर, २०२१मध्ये निवृत्त होत आहेत.  दरम्यान, मुख्य सचिवांसारख्या महत्त्वाच्या पदासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या धुरिणांचे कोणाच्या नावावर एकमत होते हे महत्त्वाचे असेल. 

कोण आहेत सीताराम कुंटे?

सीताराम कुंटे हे 1985 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी
गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून सध्या कार्यरत
सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणूनही सेवा
2012 ते 2015 या कालावधीत मुंबई महापालिकेचे आयुक्तपद
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणूनही काम पाहिले
महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक विभाग हाताळण्याचा अनुभव
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून अनुभव
 

Web Title: Sitaram Kunte as the Chief Secretary of the state, find out who they are.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.