लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू ठेवल्याने, दुसऱ्या दिवशी संपाचा फटका रुग्णांना सहन करावा लागला आहे. सर जे.जे. समूह रुग्णालयांतील शस्त्रक्रिया लांबणीवर पडल्या आहेत. उपनगरातील जे.जे., कामा, जीटी आणि सेंट जाॅर्ज रुग्णालयांमध्ये केवळ अत्यावश्यक शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
राज्यभरातून मुंबईतील शासकीय रुग्णालयांत उपचारांकरिता येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण संपामुळे कमी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. याविषयी अधिक माहिती देताना सर जे.जे. रुग्णालय समूहाच्या अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे यांनी सांगितले, जे.जे. रुग्णालयात बुधवारी दिवसभरात केवळ १६ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. संप नसल्यास अन्य वेळेस दिवसाला किमान ६० शस्त्रक्रिया करण्यात येतात.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"