मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई महापालिका क्षेत्रातील ३६ विधानसभा मतदारसंघांसाठी सहा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
महापालिकेच्या अखत्यारीतील संपूर्ण क्षेत्र लक्षात घेतले तर ते मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा या दोन महसूल क्षेत्रात मोडते. हे दोन्ही जिल्हे मिळून झालेल्या महानगरपालिका क्षेत्रात एकूण ३६ विधानसभा मतदारसंघ आहेत. या महापालिका क्षेत्रासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून पालिका आयुक्तांकडे जबाबदारी दिली आहे.
अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी व मतदारसंघ१. संजय यादव (मुंबई शहर जिल्हाधिकारी) - वरळी (१८२), शिवडी (१८३ ), भायखळा (१८४), मलबार हिल (१८५), मुंबादेवी (१८६), कुलाबा (१८७)२. डॉ. अश्विनी जोशी (अतिरिक्त महापालिका आयुक्त) - धारावी (१७८), शीव कोळीवाडा (१७९), वडाळा (१८०), माहीम (१८१).३. डॉ. अमित सैनी (अतिरिक्त महापालिका आयुक्त) - अणुशक्ती नगर (१७२), चेंबूर (१७३), मुलुंड (१५५), विक्रोळी (१५६), भांडूप पश्चिम (१५७), घाटकोपर पश्चिम (१६९), घाटकोपर पूर्व (१७०), मानखुर्द शिवाजी नगर (१७१) ४. राजेंद्र क्षीरसागर (जिल्हाधिकारी मुंबई उपनगरे) - विलेपार्ले (१६७), चांदिवली (१६८), कुर्ला (१७४), कलिना (१७५), वांद्रे पूर्व (१७६), वांद्रे पश्चिम (१७७) ५. अतिरिक्त महापालिका आयुक्त, पश्चिम उपनगरे (नियुक्तीच्या प्रतीक्षेत) - जोगेश्वरी (१५८), दिंडोशी (१५९), गोरेगाव (१६३), वेसावे (वर्सोवा) (१६४), अंधेरी पश्चिम (१६५), अंधेरी पूर्व (१६६)६. अभिजीत बांगर (अतिरिक्त महापालिका आयुक्त, प्रकल्प) - बोरिवली (१५२), दहिसर (१५३), मागाठाणे (१५४), कांदिवली पूर्व (१६०), चारकोप (१६१), मालाड पश्चिम (१६२)