जिनोम सिक्वेन्स तपासणी होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ब्रिटनवरून आलेल्या प्रवाशांपैकी सहाशे जणांची कोरोना चाचणी पालिकेच्या वैद्यकीय पथकाने आतापर्यंत केली आहे. यापैकी १२ प्रवासी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. मात्र आता सहा प्रवासी निगेटिव्ह असल्याचे समोर आले. हे प्रवासी कोरोनामुक्त झाले असले तरी खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात ठेवले आहे. तर जिनोम सिक्वेन्ससाठी पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडे पाठवण्यात आलेल्या उर्वरित सहा प्रवाशांचा चाचणी अहवाल दोन दिवसांत येणे अपेक्षित आहे.
बाधित रुग्णांसाठी ब्रिटनवरून परतलेल्या संशयित आणि पॉझिटिव्ह रुग्णांसाठी पालिकेच्या अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात १०० खाटांचा विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. ब्रिटन-युरोप-आखाती देशावरून आलेल्या एकूण २६०० प्रवाशांची यादी राज्य सरकारने महापालिकेला दिली आहे. त्यांचा शोध घेऊन ‘आरटी-पीसीआर’ चाचण्या करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे.
....................