गौरीशंकर घाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लोकसभा निवडणुकांसाठी मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून १९ उमेदवारांचे ३२ अर्ज वैध ठरले आहे. दादर, प्रभादेवी, पारसी कॉलनी, धारावी अशा हा बहुरंगी मतदारसंघ. येथील उमेदवारांची शैक्षणिक पात्रताही अशाच वैविध्याने नटली आहे.
पाचवी पास, दहावी नापास उमेदवारांपासून डॉक्टरेट आॅफ डिव्हिनिटीची पदवी घेतलेले फादर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या अर्जात ही माहिती समोर आली आहे. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. शिवसेनेचे राहुल शेवाळे यांनी स्थापत्यशास्त्रात पदविका संपादन केली आहे, तर काँग्रेसचे एकनाथ गायकवाड दहावीपर्यंत शिकलेआहेत.
तर, वंचित बहुजन आघाडीचे संजय भोसले यांनी बीएएमएस केल्याचे नमूद केले आहे. अकरा उमेदवार केवळ शालेय शिक्षण घेऊ शकले, तर केवळ चारच उमेदवार पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊ शकले. कायद्याचे शिक्षण घेतलेले आहे. पाचवी, सहावी, सातवीआणि नववीपर्यंतच शिक्षण असलेला प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात आहे.उच्चशिक्षित चेहराच नाहीउच्चशिक्षितांनी राजकारणात आले पाहिजे, असा मतप्रवाह असला, तरी किमान या मतदारसंघात तरी तसे चित्र नाही. तांत्रिकदृष्ट्या एका उमेदवाराने डॉक्टरेट मिळविली असली, तो धार्मिक शिक्षणाचा भाग आहे. विशेष, म्हणजे अपक्ष उमेदवारांचा आढावा घेतल्यास कष्टकरी वर्ग आणि छोट्या-छोट्या धार्मिक, भाषिक समूहाचे प्रतिनिधित्व करणारे उमेदवार आहेत. ाोंदणी असलेल्या छोट्या पक्षाचे उमेदवार कायद्याचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांच्या पक्षाच्या नावात रिपब्लिक, सोशलिस्ट, अँटी करप्शन अशा शब्दांचा समावेश आहे.
बारावीपर्यंतचे बारा उमेदवारएकूण १९ उमेदवारांपैकी १२ उमेदवार असे आहेत की, जे बारावीपर्यंतही शिक्षण घेऊ शकले नाहीत. चार जणांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. यातील दोघांनी एलएलबी केली आहे, तर वाणिज्य आणि कला शाखेतील प्रत्येकी एक एक उमेदवार आहे. पाचवीच्या आतील पाच उमेदवार आहेत.कळकळ हवी...शिक्षण गैरलागू आहे. उच्चशिक्षित असूनही भ्रष्ट लोक आपण पाहतोच आहोत. पुस्तकी माहितीपेक्षा कॉमन सेंन्सवाला नेता कधीही चांगला. काहीतरी करण्याची तळमळ हवी. त्याच भावनेनने त्यांचे राजकारण सुरू आहे का, हे मतदारांनी पाहायला हवे.- जयेश रहाळकर (व्यावसायिक)तांत्रिक समज हवीचही लोकसभेची निवडणूक आहे. शिक्षण आणि राजकारणाचा थेट संबंध नसला, तरी किमान तांत्रिक माहिती हवीच. संरक्षण, विदेश नीती वगैरे विषय आल्यास माहिती नसलेले उमेदवार काय मत मांडणार?गंभीर विषय कसे हाताळायचे याबाबतची समजही हवीच.- सागर केळसकर (नोकरी)
विचारधारा महत्त्वाचीशिक्षण महत्त्वाचे आहेच. त्या शिक्षणातून प्रगल्भताही आली आहे का, हे तपासायला हवे. सध्या पक्ष केंद्रीत राजकारण सुरू झाले आहे. त्यामुळे उमेदवार आणि त्याच्या पक्षाची विचारधारा महत्त्वाची बनली आहे. मागास विचारसरणीचा प्रतिनिधी असेल तर उपयोग नाही.- अजित कांबळे (विद्यार्थी)