नव्या मार्गांवर सहा डब्यांची मेट्रो
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 02:41 AM2019-08-01T02:41:26+5:302019-08-01T02:41:43+5:30
मेट्रो २-अ, २-ब आणि ७ मार्ग : ३ हजार १५ कोटी रुपयांचा करार
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो २-अ, २-ब आणि ७ साठी ३७८ डबे बनविण्याची जबाबदारी बीईएमएलवर सोपविली असून, यासाठी ३ हजार १५ कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. त्यानुसार, ६ डब्यांच्या ६३ ट्रेन्स तयार करण्यात येणार असून, अतिरिक्त मेट्रो मार्गाचे विस्तारीकरण लक्षात घेता एमएमआरडीएने आणखी २१ टेÑन्स (१२६ डबे) सदर कंपनीकडून मागविल्या आहेत. सप्टेंबर २०१९ पर्यंत डब्याचा नमुना तयार होणे अपेक्षित असून, सहा डब्यांची पहिली टेÑन जुलै २०२० मध्ये येणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा हा पहिला मेट्रो प्रकल्प राबविण्यात आला. सद्य:स्थितीमध्ये या मार्गावर धावत असलेल्या मेट्रो या चार डब्यांच्या आहेत. मात्र आता मेट्रो २-अ, २-ब आणि ७ साठीच्या मेट्रोचे डबे सहा असणार आहेत. परिणामी, जेव्हा हे मार्ग प्रत्यक्षात सुरू होतील; तेव्हा अधिकाधिक मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. विशेषत: प्राधिकरणाने अतिरिक्त मार्गाचा विचार करीत अतिरिक्त २१ टेÑन्सचा विचार केला असून, या मार्गांमुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक अधिक सुलभ होणार आहे.
मेट्रोचे काम सुरू झाल्यापासून पाच वर्षांत मुंबईने सार्वजनिक वाहतुकीचा एक प्रमुख मार्ग म्हणून मेट्रोला स्वीकारले. गर्दी व्यवस्थापनासह मेट्रोची यंत्रणा अधिकाधिक उत्तम करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
- आर.ए. राजीव, महानगर आयुक्त, एमएमआरडीए
मेट्रो-२ अ, २ ब व ७ साठी मेट्रो डबे बनविणाऱ्या बंगळुरू येथील पहिल्या वेल्डिंग समारंभाला एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव यांनी भेट दिली. या वेळी गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक मंगु सिंग उपस्थित होते.
मेट्रोची सेवा
आणखी सुधारणार
मेट्रोची सेवा आणखी सुधारता यावी यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे वर्ल्ड रिसोर्सोस, इंडिया रॉस सेंटर आणि टोयोटा मोबिलिटी फाउंडेशनसोबत स्टॅम्प अर्थात स्टेशन अॅक्सेस अॅण्ड मोबिलिटी प्रोग्रामचा शुभारंभ करण्यात आला आहे. मेट्रोमधील गर्दीच्या व्यवस्थापनासह मेट्रो स्टेशनपर्यंतच्या प्रवासातील प्रथम आणि अंतिम टप्प्यातील संपर्क सुविधा मुंबई मेट्रोला मिळावी, इनोव्हेटिव्ह डेटा आणि तंत्रज्ञानाधारित उपाययोजना शोधता याव्यात, सार्वजनिक खासगी भागीदारीला चालना देता यावी; हे या प्रोगामचे वैशिष्ट्य आहे. महत्त्वाचे म्हणजे या उपक्रमाला मुंबई महापालिका, वाहतूक पोलीस, मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीकडून सहकार्य मिळणार आहे.
मेट्रोच्या डब्यांची वैशिष्ट्ये!
च्मेट्रो टेÑन्स पर्यावरणपूरक असणार आहेत.
च्मेट्रो टेÑन्समध्ये संवादावर आधारित नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
च्मेट्रोचे डबे अद्ययावत, हलके आणि ऊर्जा वाचविणारे आहेत.
च्चालकरहित या टेÑन्स पूर्णपणे स्वयंचलित असणार आहेत.
च्टेÑन्स स्टेनलेस स्टीलच्या असणार आहेत. ३.२० मीटर रुंद असतील.
च्३३४ प्रवासी बसू शकतील.
च्एकूण २ हजार ९२ प्रवासी
६ डब्यांच्या टेÑन्समधून प्रवास करू शकतील.
च्रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सुविधा
च्२५ केव्ही एसी ट्रॅक्शनवर टेÑन्स चालणार.
च्व्हीलचेअरसाठीही जागा
च्डब्यांबाहेरही सीसीटीव्ही
च्महिलांसाठी सुरक्षा व्यवस्था
च्चालक-प्रवासी संवाद शक्य
च्प्रवाशांना माहिती पुरविण्याची सुविधा
च्स्वयंचलित घोषणा उपलब्ध
च्प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर उपलब्ध