कृष्णेतून वाहिले सहा कोयनेचे पाणी!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 04:22 AM2019-09-06T04:22:51+5:302019-09-06T04:24:44+5:30
कृष्णा-भीमा खोरे : भीमा नदीतून सोडले बारा पानशेतचे पाणी
विशाल शिर्के
पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे कृष्णा आणि भीमा खोऱ्यातील धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. तब्बल सहा कोयना धरणे भरतील इतके पाणी कृष्णेत सोडण्यात आले. त्यातील तब्बल पाच कोयना धरणांचे पाणी कोल्हापूर-महाबळेश्वरच्या घाटरांगांमधून कृष्णेत आले.
राज्यात उजनी धरणाची एकूण साठ्याची क्षमता सर्वाधिक ११७.४७ अब्ज घनफूट (टीएमसी) इतकी आहे. तर, कोयना धरणाची उपयुक्त साठ्याची क्षमता सर्वाधिक १०० टीएमसी आहे. कृष्णा खोºयातील घाटमाथ्यावर पडलेल्या पावसामुळे आॅगस्टच्या सुरुवातीस सांगली, कोल्हापूर आणि साताºयातील कराडमध्ये पूरस्थिती उद्भवली होती. कृष्णेच्या प्रमुख उपनद्यांपैकी कोयना, दूधगंगा, पंचगंगा, वारणा या नद्यांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी कृष्णेत जमा झाले होते. कृष्णा नदीच्या खोºयात कोयना धरणासह धोम, वारणावती, दूधगंगा, राधानगरी, ऊरमोडीसह १३ प्रमुख धरणे आहेत. यात सध्या २०८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. येरळवाडी धरणात ०.४७ टीएमसी (६७ टक्के) पाणी आहे. हा अपवाद वगळता सर्व धरणात गुरुवार अखेरीस ९५ ते १०० टक्के पाणीसाठा होता.
ही धरणे भरल्यानंतरही अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. कृष्णेत यंदाच्या मॉन्सूनमध्ये राजापूर बंधाºयातून ४२० टीएमसी पाणी कर्नाटकातील अलमट्टी धरणात गेले. तर, दूधगंगा नदीतून जवळपास ८० टीएमसी पाणी कृष्णेत पोहोचले. म्हणजेच तब्बल ५०० टीएमसी अतिरिक्त पाणी कृष्णेतून पुढे आंध्र प्रदेशाकडे वाहिले.
भीमा नदीच्या खोºयातही यंदा जोरदार वृष्टी झाली. या खोºयातील २३ धरणांपैकी माणिकडोह, मुळशी, पवना, वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघरसह १८ धरणांचे पाणी उजनी नदीत येते. उजनी धरणाची क्षमता ११७ टीएमसी असून, त्यात ५३.५७ उपयुक्त आणि ६३.६५ मृतसाठा आहे. जूनमध्ये धरणातील मृतसाठा देखील उणे होता. एकट्या, खडकवासला साखळीतील धरणातून ४ ते ८ आॅगस्ट दरम्यान २२.५० टीएमसी पाणी उजनीत जमा झाले. पुणे जिल्ह्यातील धरणातील पाण्याने उजनी धरण पूर्ण भरल्यानंतर तब्बल ७० टीएमसी पाणी भीमेत सोडण्यात आले.
५५.८८ टीएमसी पाणी निरेतून भीमेत
नीरा नदीच्या खोºयातही जोरदार पाऊस झाला. या खोºयातील गुंजवणी, भाटघर, नीरादेवघर आणि वीर धरणाची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता ४८.३५ टीएमसी आहे. त्यातील नीरा-देवघर, भाटघर आणि गुंजवणीचे पाणी वीर धरणात येते. वीरमधून पुढे नीरेत पाणी सोडण्यात येते. ही नीरा नदी नरसिंगपूरजवळ भीमा नदीला मिळते. यंदा नीरेतून तब्बल ५५.८८ टीएमसी पाणी भीमेत गेले. म्हणजेच तब्बल १२५.८८ टीएमसी पाणी भीमेतून वाहिले. पुढे, भीमा नदी कृष्णेला तेलंगणा-कर्नाटकच्या सीमेवर मिळते. याचाच अर्थ कृष्णा नदीत भीमा-कृष्णा खोºयातील नद्यांचे तब्बल ६२५.८८ टीएमसी पाणी गेले.