Join us

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास उरले सहा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:59 AM

मुंबई : मुंबईतील विविध ठिकाणच्या २१७ घरांसाठी म्हाडामार्फत लॉटरी काढण्यात येणार आहे. या घरांसाठी अर्ज दाखल करून अनामत रक्कम ...

मुंबई : मुंबईतील विविध ठिकाणच्या २१७ घरांसाठी म्हाडामार्फत लॉटरी काढण्यात येणार आहे. या घरांसाठी अर्ज दाखल करून अनामत रक्कम भरण्यासाठी अवघे सहा दिवस उरले आहेत. आत्तापर्यंत ३७ हजार ८८२ जणांनी अनामत रक्कमेसह अर्ज दाखल केल्याने या लॉटरीसाठी चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, या सहा दिवसात यामध्ये आणखी पाच ते सहा हजार अर्जदारांची भर पडेल असा विश्वास म्हाडाने व्यक्त केला आहे.

म्हाडाने सदनिकांच्या लॉटरीसाठी आॅनलाइन अर्ज करण्यासाठी ७ मार्चपासून सुरुवात करण्यात आली. शनिवारी सायंकाळपर्यंत एक लाख ७८ हजार ७८८ अर्जदारांनी नोंदणी केली. यापैकी ३४,७३५ अर्जदारांनी आॅनलाइन, तर ३,१४७ अर्जदारांनी आरटीजीएस पद्धतीने अनामत रकमेचा भरणा केला आहे. सध्या ३७ हजार ८८२ अर्जदारांनी सोडतीत सहभाग दर्शवला असून, २४ मेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे अर्जदारांच्या संख्येत आणखी वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

नव्या तारखांनुसार आता २४ मे पर्यंत आॅनलाइन अर्ज दाखल करता येणार असून, शुल्क भरण्यासाठी २४ मेपर्यंत संधी असून, सोडतीसाठी २ जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. तसेच २७४ दुकानांची सोडत १ जून रोजी काढण्यात येणार असून, म्हाडामध्ये नुकतेच आयटी विभागाकडून दुकानांची आॅनलाइन सोडत कशी असणार याबाबत मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या सोडतीसाठी सायन, प्रतीक्षानगर ३५ दुकाने, मालाड मालवणी येथे ६९, गव्हाणपाडा मुलुंड, विनोबा भावेनगर कुर्ला, गोरेगाव येथे एकूण २७४ दुकाने आहेत.