सहा जणांची सराईत दरोडेखोरांची टोळी गजाआड

By admin | Published: July 21, 2015 02:05 AM2015-07-21T02:05:02+5:302015-07-21T09:13:06+5:30

दरोडे, चोऱ्या करणारी सहा जणांची सराईत टोळी खार व वांद्रे पोलिसांनी नुकतीच गजाआड करून मुंबई, ठाणे, नवी मुंबईत हद्दीत घडलेल्या आठ गंभीर गुन्ह्यांची उकल केली आहे

Six gangsters gang-raped | सहा जणांची सराईत दरोडेखोरांची टोळी गजाआड

सहा जणांची सराईत दरोडेखोरांची टोळी गजाआड

Next

मुंबई : दरोडे, चोऱ्या करणारी सहा जणांची सराईत टोळी खार व वांद्रे पोलिसांनी नुकतीच गजाआड करून मुंबई, ठाणे, नवी मुंबईत हद्दीत घडलेल्या आठ गंभीर गुन्ह्यांची उकल केली आहे. या टोळीकडून शस्त्रसाठा व गुन्ह्यात चोरी झालेले दीड लाखांचे सोने हस्तगत करण्यात आले. या टोळीकडून आणखीही अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची व गुन्ह्यात चोरलेला लाखोंचा ऐवज हस्तगत होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
आसीफ शेरअली अन्सारी, राज महोम्मद युनूस शेख, रामभरोसे ऊर्फ राजू शंकर ठाकूर, मोहम्मद कुबेर महोम्मद हनीफ शेख, इसाक महोम्मद जुबेद शेख आणि अकबर सईद आलम शेख अशी अटक आरोपींची नावे आहेत. ही टोळी १३ जुलैला खार पश्चिमेकडील एका ज्वेलर्सवर दरोडा घालणार होती. याबाबतची माहिती खार पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश कदम यांना मिळाली. साहाय्यक आयुक्त संजय कदम व वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय भरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक कदम, एपीआय कळमकर, पीएसआय पाटील आणि पथकाने सापळा रचून ही टोळी गजाआड केली. टोळीने वांद्रे, सांताक्रूझ, वाकोला, खार, खारघर आणि डोंबिवली परिसरात घडलेले ८ दरोडे, जबरी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानुसार पथकाने पुढील तपासात दीड लाखांचे सोने हस्तगत केले. यापैकी राज शेखवर १० गुन्हे नोंद असून, त्यापैकी ४ गुन्ह्यांमध्ये त्याला न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. तसेच २०१४मध्ये त्याला मुंबईतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते. अन्य आरोपी आसीफविरोधात १८ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. एका गुन्ह्यात त्याला शिक्षा झालेली आहे, तर रामभरोसे व शेख या दोघांनाही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.

Web Title: Six gangsters gang-raped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.