रविवारी हार्बरवर सहा तासांचा मेगाब्लॉक

By Admin | Published: October 24, 2015 02:41 AM2015-10-24T02:41:41+5:302015-10-24T02:41:41+5:30

वडाळा येथे क्रॉसओव्हरची जागा बदलण्याचे काम आणि अन्य तांत्रिक कामांसाठी हार्बरवर सहा तासांचा मेगाब्लॉक येत्या रविवारी २५ आॅक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे गरज

A six-hour megablock on Harbor on Sundays | रविवारी हार्बरवर सहा तासांचा मेगाब्लॉक

रविवारी हार्बरवर सहा तासांचा मेगाब्लॉक

googlenewsNext

मुंबई : वडाळा येथे क्रॉसओव्हरची जागा बदलण्याचे काम आणि अन्य तांत्रिक कामांसाठी हार्बरवर सहा तासांचा मेगाब्लॉक येत्या रविवारी २५ आॅक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे गरज असेल तरच प्रवास करा, अन्यथा हार्बरचा प्रवास टाळा, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. मस्जिद ते चुनाभट्टी आणि वडाळा रोड ते माहीम दरम्यान हा ब्लॉक सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत घेतला जाईल.
हार्बरवरील मेगाब्लॉक दरम्यान सीएसटी ते वाशी, बेलापूर आणि पनवेल दरम्यान लोकल फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे सीएसटी ते वांद्रे, अंधेरी दरम्यानच्याही लोकल सेवा रद्द केल्या जातील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल फेऱ्या सोडण्यात येतील. कुर्ला येथून आठ नंबरवरून लोकल सुटतील, असे सांगण्यात आले. ब्लॉक काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना मेन लाइन तसेच पश्चिम रेल्वेवरून त्याच तिकिटावर प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. वडाळा येथे क्रॉसओव्हरची जागा बदलण्याचे काम केले जाणार असल्याने त्यामुळे बारा डबा प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचा कामास मदत मिळणार आहे. या ब्लॉकबरोबरच मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरही मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप (सीएसटीच्या दिशेने) धिम्या मार्गावर सकाळी सव्वाअकरा ते दुपारी सव्वातीन वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे या मार्गादरम्यान अप धिम्या मार्गावरील लोकल अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. अप धिम्या मार्गावर नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार स्थानकात लोकल थांबणार नाहीत. (प्रतिनिधी)

पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक
अनेक तांत्रिक कामांसाठी पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते बोरीवली दरम्यान पाचव्या मार्गावर सकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.

Web Title: A six-hour megablock on Harbor on Sundays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.