मध्य रेल्वेवर उद्या सहा तासांचा ब्लॉक; तिन्ही मार्गांवरील प्रवाशांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 05:01 AM2018-07-07T05:01:40+5:302018-07-07T05:01:51+5:30
विद्याविहार-भायखळा मार्गादरम्यान रविवारी धिम्या मार्गावर मध्य रेल्वेने सहा तासांचा मेगाब्लॉक घोषित केला आहे. हार्बर मार्गावरही रविवारी कुर्ला-वाशीदरम्यान दोन्ही मार्गांवर, तर पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ-गोरेगाव स्थानकांदरम्यान अप-डाऊन धिम्या मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई : विद्याविहार-भायखळा मार्गादरम्यान रविवारी धिम्या मार्गावर मध्य रेल्वेने सहा तासांचा मेगाब्लॉक घोषित केला आहे. हार्बर मार्गावरही रविवारी कुर्ला-वाशीदरम्यान दोन्ही मार्गांवर, तर पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ-गोरेगाव स्थानकांदरम्यान अप-डाऊन धिम्या मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेवरील विद्याविहार-भायखळा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर रविवारी सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल. यामुळे घाटकोपर येथून सुटणाऱ्या धिम्या लोकल अप जलद मार्गावर वळविण्यात येतील.
कुर्ला-वाशी स्थानकांदरम्यान ११.१० ते ४.१० मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल. यामुळे सीएसएमटी-पनवेल/ बेलापूर/ वाशी मार्गावरील अप-डाउन मार्गावरील लोकल फेºया बंद राहतील. पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ - गोरेगाव स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी १० वाजून ३५ मिनिटे ते दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत अप-डाउन धिम्या मार्गावर जम्बो ब्लॉक असेल.