एअर इंडिया कंपनीच्या इमारत खरेदीसाठी सहा सदस्यीय कमिटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 05:07 AM2018-07-27T05:07:55+5:302018-07-27T05:08:30+5:30

कमिटीच्या अहवालानंतर जेएनपीटीने एअर इंडियाची बहुमजली इमारत खरेदीबाबत निर्णय घेतला जाणार

A six-member committee to buy the Air India Company building | एअर इंडिया कंपनीच्या इमारत खरेदीसाठी सहा सदस्यीय कमिटी

एअर इंडिया कंपनीच्या इमारत खरेदीसाठी सहा सदस्यीय कमिटी

Next

उरण : एअर इंडिया कंपनीच्या मुंबईस्थित मुख्यालयाचीही २३ मजली इमारत खरेदीच्या चाचपणीसाठी केंद्रीय मिनिस्ट्री आॅफ शिपिंगने सहा सदस्यीय कमिटी तयार केली आहे. कमिटीच्या अहवालानंतर जेएनपीटीने एअर इंडियाची बहुमजली इमारत खरेदीबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
एअर इंडियाच्या इमारत खरेदीचा प्रस्ताव गुरुवारी मुंबईतील जेएनपीटी बोर्ड आॅफ ट्रस्टीच्या माहितीसाठी सादर झाला. इमारत खरेदीच्या अभ्यासासाठी केंद्रीय मिनिस्ट्री आॅफ शिपिंगने सहा सदस्यीय कमिटी तयार केली आहे. जेएनपीटी, एअर इंडियाचे चेअरमन आणि नागरी उड्डाण मंत्रालयातील सेक्रेटरी, जॉइंट सेके्र टरी आदी सहा सदस्यांचा या कमिटीत समावेश असेल. कमिटी इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करेल. सोबतच इमारतीचे व्हॅल्युएशन, इमारत खरेदीचे डील-अनडीलचा अभ्यासही करेल. कमिटीच्या अहवालानंतर जेएनपीटीने एअर इंडियाची बहुमजली इमारत खरेदीबाबत निर्णय होईल.
आर्थिक तोट्यामुळे एअर इंडिया कंपनीच्या मुंबईस्थित मुख्यालयाचीही इमारत खरेदी करण्याचा निर्णय पंतप्रधान कार्यालयाने नुकताच जाहीर केला आहे. पाच वर्षापूर्वी डबघाईला आलेल्या एअर इंडियाची इमारत जेएनपीटीने ८०० कोटीत खरेदी करण्याचा प्रस्ताव जेएनपीटी बोर्ड आॅफ ट्रस्टींच्या बैठकीत मंजुरीसाठी आला होता. मात्र तो तहकूब केला होता. नितीन गडकरींच्या हाती जेएनपीटीची सूत्रे गेल्यानंतर आता इमारत खरेदीचा प्रस्ताव पुन्हा आला आहे. पीएमओ कार्यालयाने हिरवा कंदील दाखविल्यानंतर इमारत खरेदीच्या हालचालींचा वेग येईल.

Web Title: A six-member committee to buy the Air India Company building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.