सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सहा महिने मोफत पास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 05:18 AM2018-09-13T05:18:32+5:302018-09-13T05:18:44+5:30

एसटी महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचा-यांना सहा महिने मोफत प्रवासी पास देण्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली.

Six months free pass for retired employees | सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सहा महिने मोफत पास

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सहा महिने मोफत पास

Next

मुंबई : एसटी महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचा-यांना सहा महिने मोफत प्रवासी पास देण्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. यामुळे वर्षातील सहा महिने सेवानिवृत्त कर्मचाºयांना सपत्नीक राज्यात कुठेही मोफत प्रवास करणे शक्य होईल.
एसटी महामंडळात सुमारे १ लाख ४ हजार कर्मचारी आहेत. दरवर्षी महामंडळातून सुमारे ४ हजार कर्मचारी निवृत्त होतात. नुकतेच राज्यातील सुमारे २५ हजार निवृत्त कर्मचाºयांनी यात्रा व उत्सव काळात प्रवासी पास देण्याची मागणी केली होती. यानुसार काही रक्कम भरण्याची तयारीही सेवानिवृत्त कर्मचाºयांनी दर्शवली होती. यानुसार एसटीसाठी आपले आयुष्य वेचलेल्या सेवानिवृत्त कर्मचाºयांना पत्नींसह वर्षातील सहा महिने कुठेही जाण्यासाठी मोफत प्रवासी पास देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. हा निर्णय स्वागतार्ह असून सुमारे २५ हजार सेवानिवृत्त कर्मचाºयांना याचा लाभ घेता घेता येणार असल्याचे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली.
>शिवशाहीबाबत संभ्रम
महामंडळाच्या अत्याधुनिक आणि वातानुकूलित शिवशाहीत सेवानिवृत्त कर्मचाºयांचा मोफत प्रवासी पास वैध ठरेल का? याबाबत साशंकता आहे.

Web Title: Six months free pass for retired employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.