मुंबई : मुंबई ते पुणे मार्गावर एसटी महामंडळाच्या ताफ्यात ८ नवीन शिवनेरी बसेस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई ते पुणे मार्गावर एसटीच्या ३२ फेऱ्या जादा वाढल्या आहेत. परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या निर्देशानुसार शिवनेरी बसच्या तिकीट दरात कपात करण्यात आली. त्यामुळे काही प्रमाणात शिवनेरीकडे प्रवासी वळल्याने, प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन २० शिवनेरी बस सुरू करण्याचा संकल्प महामंडळाकडून करण्यात आला. त्यापैकी ८ शिवनेरी बस मुंबई ते पुणे मार्गावर शुक्रवारपासून धावू लागल्या.सध्या मुंबई ते पुणे मार्गावर शिवनेरी बसच्या २७२ फेºया सुरू आहेत. यात शुक्रवारपासून ३२ फेऱ्यांची वाढ झाल्याने, दररोज एकूण ३०४ फेºया चालविण्यात येतील. दादर-पुणे, दादर-स्वारगेट, बोरीवली - स्वारगेट, ठाणे - स्वारगेट अशा विविध मार्गांवर ३०४ फेºया चालविण्यात येतील.दरम्यान, शिवनेरीमध्ये महिला प्रवाशांसाठी ३ ते १२ अशी दहा आसने आरक्षित आहेत. सुरक्षित व सुखकर प्रवासासाठी महिला प्रवाशांची पहिली पसंती शिवनेरी आहे. वाढलेल्या फेऱ्या आणि कमी झालेले तिकीट दर याचा जास्तीतजास्त फायदा प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून केला आहे.घाट भागातील काम पूर्ण होईपर्यंत जादा बसमध्य रेल्वे मार्गावरील कर्जत ते लोणावळा घाट भागात पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी तसेच या मार्गावरील देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी अनेक मेल, एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई-पुणे मार्गावर शिवनेरीच्या २४ जादा फेºया चालविण्यात येत आहेत, तर मुंबई-पुणे मार्गावर दररोज १८० जादा बस सोडण्याचे निर्देश परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिले आहेत.रेल्वेचे घाट भागातील काम ९ ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार होते. मात्र, ते अद्याप पूर्ण न झाल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीच्या जादा फेºया धावतील, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.जुलै महिन्यात २१ हजार प्रवाशांची वाढ८ जुलैपासून मुंबई ते पुणे मार्गावरील शिवनेरी बसचे भाडे ८० ते १२० रुपयांनी कमी केले. त्यामुळे प्रवाशांचा कल शिवनेरीकडे वळला. त्यामुळे मागील वर्षीच्या जुलै महिन्यापेक्षा यंदाच्या जुलैमध्ये शिवनेरीतून प्रवास करणारे अंदाजे २१ हजार प्रवासी वाढले.
मुंबई-पुणे मार्गावर ‘शिवनेरी’च्या ३२ जादा फेऱ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 3:40 AM