Join us

दरोड्यासाठी आलेल्या सहा जणांना अटक

By admin | Published: August 18, 2016 5:06 AM

एका सोने व्यापाऱ्याच्या कार्यालयात घुुसून दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या सहा सराईत दरोडेखोरांना सोमवारी पहाटे माटुंगा पोलिसांनी जेरबंद केले. या आरोपींकडून पोलिसांनी दरोड्याचे

मुंबई : एका सोने व्यापाऱ्याच्या कार्यालयात घुुसून दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या सहा सराईत दरोडेखोरांना सोमवारी पहाटे माटुंगा पोलिसांनी जेरबंद केले. या आरोपींकडून पोलिसांनी दरोड्याचे काही साहित्य आणि चॉपर, सुरा यासारखी हत्यारे जप्त केली आहेत. संतोष हयाळ (२१), बादल मन्ना (३४), सुमीत यादव (३४),राजन दास(२३), प्रदीप नाटमे(२४) आणि प्रतापसिंह मनचंदा (५८) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना २० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढवण्यात आला होता, अशाच प्रकारे माटुंगा पोलीस ठाण्यातील काही अधिकारी आणि कर्मचारी सोमवारी पहाटे मयेश्वरी उद्यान परिसरात गस्त घालत होते. या दरम्यान त्यांना टॅक्सीमध्ये काही जण संशयास्पद हालचाली करत असल्याचे लक्षात आल्यानंतर, त्यांनी टॅक्सीतील चालकासह सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांची तपासणी केली असता, त्याच्याजवळ चाकू, चॉपर, गॅस कटर आणि काही लोखंडी रॉड आढळून आले. या आरोपींना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता, माटुंगा परिसरात राहात असलेल्या एका सोने आणि हिरे व्यापाऱ्याच्या कार्यालयात दरोडा घालण्याची तयारीत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. काही दिवसांपूर्वीच या आरोपींनी या व्यापाऱ्याच्या दुकानाची टेहळणी केली होती. त्यानुसार, त्यांनी १५ आॅगस्टच्या पहाटे दरोडा घालण्याची योजना आखल्याची कबुली दिली.(प्रतिनिधी)जेलमध्ये टोळी बनविली- माटुंगा पोलिसांनी अटककेलेले हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांत अनेक गुन्हे दाखल आहेत, तसेच अनेकदा या आरोपींना शिक्षादेखील झालेली आहे. - काही वर्षांपूर्वी जेलमध्ये असताना त्यांची एकमेकांशी ओळख झाली. जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी ही टोळी तयार केली असून, त्यांच्या तिघा साथीदारांचा शोध सुरू आहे.