मुंबई : विधानसभेतून राज्यसभेवर पाठवावयाच्या सहा जागांसाठीची निवडणूक अखेर भाजपाच्या विजया रहाटकर यांच्या माघारीमुळे बिनविरोध झाली. भाजपाच्या विजया रहाटकर माघार घेणार, असे वृत्त लोकमतने यापूर्वीच दिले होते. रहाटकर यांचा अर्ज त्यांचे प्रतिनिधी म्हणून संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी मागे घेतला व सहा जणांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला.>राज्यसभेवर बिनविरोध निवडून जाणारेकेंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकरमाजी मुख्यमंत्रीनारायण राणेकेरळ भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्षव्ही. मुरलीधरन (भाजपा)राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाणशिवसेनेचे अनिल देसाईंंकाँग्रेसचे कुमार केतकर>राणेंनी सेनेला डिवचलेमला राज्यसभेची संधी भाजपाने दिली, तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल असे मी वाचले होते. आता मी खासदार झालो आहे. कदाचित शिवसेना उद्यापासून सत्तेत नसेल, असे सांगत नारायण राणे यांनी शिवसेनेला डिवचले. काँग्रेसमध्ये मी करमून घेतले तसे भाजपामध्येही घेईन.भाजपा व मी एकमेकांची गरज असेल तशी ‘अॅडजेस्टमेंट’ करू. मी दिल्लीत स्थिरावेन का हे आताच सांगता येत नाही. मी एकाच जागी स्थिर राहीन का हेही सांगता येत नाही, अशी टिप्पणीही राणे यांनी केली.
राज्यातून सहा जण राज्यसभेवर बिनविरोध, रहाटकर यांची माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 6:42 AM