Join us

अमलीपदार्थ बाळगले;सहा विद्यार्थी अटकेत

By admin | Published: November 13, 2014 12:42 AM

आरोग्यासाठी घातक मात्र नशेसाठी वापरण्यात येणारा क्रिस्टल मेथ हा अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी सहा विद्याथ्र्याना अटक करण्यात आली आहे.

नवी मुंबई : आरोग्यासाठी घातक मात्र नशेसाठी वापरण्यात येणारा क्रिस्टल मेथ हा अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी सहा विद्याथ्र्याना अटक करण्यात आली आहे. खंडणीविरोधी पथकाने नेरूळ येथे मंगळवारी रात्री ही कारवाई केली. त्यांच्याकडून 2 लाख 29 हजार रुपये किमतीचा क्रिस्टल मेथ जप्त करण्यात आला. महाविद्यालयीन तरुणांमध्ये नशेसाठी त्याचा वापर केला जात असून यामुळे नवी मुंबईत अमली पदार्थ विकणारी मोठी टोळी कार्यरत असल्याचा अंदाजही पोलीसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 
नेरूळ सेक्टर 6 व सारसोळे येथे ही कारवाई करण्यात आली आहे. सदर ठिकाणी काही तरुण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार गुन्हेशाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे, सहाय्यक पोलीस उपआयुक्त रणजित धुरे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजन जगताप यांच्या पथकाने सापळा रचला होता. त्यामध्ये सहा तरुणांना अटक करण्यात आली.
 मिङर बेग (34), नौसिक मुकादम (25), राजीव शेख (21), फेलान खान (26), अल्ताफ अली र्मचड (42) आणि वैभव गुप्ता (29) अशी त्यांची नावे आहेत. हे सर्व जण नवी मुंबईसह मुंबई परिसरातील राहणारे आहेत. त्यांच्यावर नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झडतीमध्ये त्यांच्याकडे 459 ग्रॅम वजनाचा क्रिस्टल मेथ हा अमली पदार्थ आढळून आला. त्यांच्याकडील मारुती कार (एमएच क्4 ईडी 5997), मोटारसायकल (एमएच 46 क्यू 5116), सहा मोबाइल फोन व रोख रक्कम देखील जप्त करण्यात आली आहे. अटक केलेले विद्यार्थी उच्चभ्रू वस्तीमधील राहणारे आहेत. (प्रतिनिधी)
 
च्क्रिस्टल मेथ हा स्फटिक स्वरूपातील अमली पदार्थ असून तो प्रयोगशाळेत तयार केला जातो. वजन कमी करणो व रात्रीची झोप येऊ नये याकरिता महाविद्यालयीन तरुण -तरुणींकडून त्याचे सेवन केले जाते. तब्बल 5क्क् रुपयाला 1 ग्रॅमप्रमाणो त्याची विक्री केली जाते. 
च्हा पदार्थ तरुणांमध्ये चावल, मेथ, एमडी तसेच स्वस्त कोकेन या नावाने परिचित असल्याचे खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजन जगताप यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमतही लाखोच्या घरात आहे.