6 हजारांसाठी झाला कृतिका चौधरीचा खून, महिन्याला घ्यायची 1 लाखाचे ड्रग्स

By admin | Published: July 11, 2017 08:06 PM2017-07-11T20:06:46+5:302017-07-11T20:07:21+5:30

गेल्या महिन्यात 12 जून रोजी अभिनेत्री आणि मॉडेल कृतिका चौधरीची हत्या झाली होती. या प्रकरणी नवा खुलासा ...

For six thousand, Krrishta Chaudhari's murder, one lakh poultry drugs for the month | 6 हजारांसाठी झाला कृतिका चौधरीचा खून, महिन्याला घ्यायची 1 लाखाचे ड्रग्स

6 हजारांसाठी झाला कृतिका चौधरीचा खून, महिन्याला घ्यायची 1 लाखाचे ड्रग्स

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - गेल्या महिन्यात 12 जून रोजी अभिनेत्री आणि मॉडेल कृतिका चौधरीची हत्या झाली होती. या प्रकरणी नवा खुलासा झाला आहे. या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन जणांना सोमवारी अटक केली होती. केवळ 6 हजार रूपयांच्या वादावरून कृतिकाचा खून करण्यात आल्याची कबुली आरोपी शकील नसीम आणि वासुदेव यांनी पोलिसांसमोर दिली आहे.  
 
कृतिकाच्या फोन रेकॉर्ड्सवरून पोलिसांना अनेक हैराण करणा-या गोष्टी समजल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक नंबर्स हे ड्रग्स पुरवठा करणा-यांचे होते. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता कृतिका रोज ड्रग्स घ्यायची हे स्पष्ट झालं. आठवड्याला ती 25 हजारांचे ड्रग्स घ्यायची, ड्रग्स पुरवठा कऱणारे इमारतीच्या सुरक्षारक्षकाकडे ड्रग्सची पुडी द्यायचे व ती पुडी कृतिकाकडे पोहोचवण्याचं काम सुरक्षारक्षक करायचे.   
(ड्रग्सच्या व्यसनातून मॉडेल कृतिका चौधरीची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय)
(मॉडेल कृतिका चौधरीच्या हत्या प्रकरणी घटस्फोटित पतीला अटक)
(‘ते’ कृतिकाचे जवळचे मित्र)
अटक केलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, कृतिका त्यांचा बॉस सनी याच्याकडून खरेदी केलेल्या ड्रग्सचे पैसे देण्यास टाळाटाळ करत होती. पैशांची मागणी केल्यावर ती नोटाबंदीचं कारण पुढे करायची. घटनेच्या दिवशीही तिला पैशांची मागणी करण्यात आली होती. नेहमीप्रमाणे कृतिकाने पैसे देण्यास नकार दिला. वाद वाढल्यानंतर फायटरने कृतिकाची निर्घृण हत्या करण्यात आली. 
 
गेल्या महिन्यात 12 जूनला 29 वर्षाची मॉडेल कृतिका चौधरी ही अंधेरीतील राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली होती. 2 ते 3 दिवसांपूर्वी डोक्यावर गंभीर वार करुन तिला मारण्यात आल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले होते. 
 
 दरम्यान, पोलीस सूत्रांनी सांगितले की, दोन्ही आरोपींना मुंबईपासून जवळच असलेल्या पनवेल येथून अटक केली. या प्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र, शवविच्छेदनाच्या अहवालानंतर समोर आले की, डोक्यात गंभीर जखम झाल्यामुळे कृतिका चौधरी हिचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड विधान 302 च्या कलमानुसार हत्येच्या गुन्हाची नोंद केली. तसेच,  तिला ड्रग्जचे व्यसन होते, त्यामुळे तिची अमली पदार्थाची विक्री करणाऱ्याकडून हत्या करण्यात आली का, या दृष्टीने पोलीस तपास करीत असल्याचे समोर आले होते. याचबरोबर, कृतिका चौधरीच्या शेजारी राहाणार्‍या लोकांनी सांगितले होते की, तिला भेटण्‍यासाठी नेहमी वेगवेगळे लोक येत होते. मात्र, तिच्यावर संशय येईल असे तिचे वर्तन कधीच दिसले नाही.
 
कृतिका चौधरी हिने अभिनेत्री कंगना राणावत सोबत रज्जो या ‍सिनेमामध्ये काम केले होते. तसेच, क्राइम सीरियल ‘सावधान इंडिया’सह बालाजी प्रॉडक्शनच्या अनेक टीव्ही सीरियल्समध्ये ती झळकली होती. याचबरोबर तिने तेलुगु भाषेतील एक सिनेमा नुकसात साइन केला होता. 

Web Title: For six thousand, Krrishta Chaudhari's murder, one lakh poultry drugs for the month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.