Join us

मुंबईत सहा हजार रुग्ण उपचाराधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असून, दैनंदिन रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असून, दैनंदिन रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मात्र अजूनही तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. शहर उपनगरात मंगळवारी ३५१ रुग्णांची नोंद झाली असून, दहा बळी गेले आहेत. परिणामी कोरोनाबाधितांची संख्या सात लाख ३१ हजार ९१४ झाली असून, मृतांचा आकडा १५ हजार ७२६ झाला आहे.

सध्या शहर उपनगरात सहा हजार १६१ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के असून, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी एक हजार ६३ दिवसांवर आला आहे. १३ ते १९ जुलैपर्यंत मुंबईतील एकूण कोविडवाढीचा दर ०.०६ टक्के असल्याचे दिसून आले आहे.

मुंबईत दिवसभरात २२ हजार १५ कोरोना चाचण्या झाल्या असून, आतापर्यंत ७८ लाख ११ हजार ७४८ चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहर उपनगरात झोपडपट्ट्या आणि चाळींच्या वस्तीत सक्रिय कंटेन्मेंट झोन्स ७ असून, सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ५८ आहे. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील तीन हजार ७३९ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे.