दोन वर्षांत सहा हजार बेशिस्त वाहनांचा परवाना रद्द!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 06:34 AM2019-08-01T06:34:18+5:302019-08-01T06:34:43+5:30
अवैध वाहतुकीला लगाम : १७,५५४ वाहने जप्त, ५५ कोटींचा दंड वसूल, परिवहन विभागाची कारवाई
नितीन जगताप
मुंबई : अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम घालण्यासाठी गेल्या दोन वर्षांत सहा हजार वाहनांचा परवाना रद्द केल्याची माहिती परिवहन विभागाने दिली. यात खासगी बससह इतर वाहनांचा समावेश आहे. मोटार वाहन कायद्याचा भंग करणे, प्रवासी बसेसमधून मालवाहतूक करणे, जादा भाडे आकारणे अशा तक्रारींची परिवहन आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून, अशा वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले आहेत.
परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार वायुवेग पथक आणि मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. एप्रिल, २०१७ ते जून, २०१९ दरम्यान झालेल्या कारवाईमध्ये पथकाकडून ३ लाख ७३ हजार ३५ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७२ हजार ८४६ वाहनांनी नियमभंग केल्याचे आढळून आले. त्यांना आकारण्यात आलेल्या दंडातून ५४ कोटी ९९ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे; शिवाय नियमभंग करणाऱ्या वाहनांपैकी १७ हजार ५५४ वाहने जप्त केली आहेत. तर १० हजार ४२१ वाहनधारकांचा आणि ६ हजार ४० वाहनांचा परवाना रद्द करण्यात आल्याची माहिती परिवहन विभागातर्फे देण्यात आली.
मोटार वाहन कायद्याचा अनेकदा वाहनचालकांकडून भंग करण्यात येतो. यासह प्रवासी बसेसमधून मालवाहतूक करणे, जादा भाडे आकारणे अशा तक्रारींची परिवहन विभागाकडे मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या. त्याची दखल घेत ही कारवाई करण्यात आल्याचे परिवहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
कालावधी तपासलेली दोषी जप्त निकाली चालक वाहन वसुली
वाहने वाहने वाहने प्रकरणे परवाना रद्द परवाना रद्द
२०१७ ते मार्च, २०१८ १७,०९,६६ ३२,२५० ७,६९४ २१,३१५ ५,००३ २,८९४ २,७२३. १६
एप्रिल, २०१८ ते मार्च, २०१९ १,७०,४२९ ३३,१३९ ७,८५६ १९,४२५ ४,४७९ २,६२५ २,११०. ८४
एप्रिल, २०१९ ते जून, २०१९ ३१,६४१ ७,१८७ २,००४ ४,३४२ ९३९ ५२१ ६६८. २८
एकूण ३,७३,०३६ ७२,८४६ १७,५५४ ४५,०८२ १०,४२१ ६,०४० ५,४९९. २८