Join us

सहा हजार मतदार वगळले; तुमचे नाव यादीत आहे का?; हरकती नोंदविण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 10:00 AM

ज्या मतदारांची दुबार नावे आहेत किंवा जे मतदार मृत आहेत त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत.

मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांच्या मतदान केंद्राची यादी व प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदारांनी या याद्यांचे अवलोकन करून हरकती असल्यास त्या नोंदविण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे. मात्र या यादीच्या प्रारूप मतदार यादीत दुबार, मृत अथवा कायमस्वरूपी स्थलांतरित अशा ६ हजार १०७ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. ज्या मतदारांची दुबार नावे आहेत किंवा जे मतदार मृत आहेत त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत.

६ हजार मतदार वगळले मुंबई शहर जिल्ह्यात मुंबई शहर जिल्हा प्रारूप मतदार यादीत एकूण मतदारांची संख्या २४ लाख ५० हजार ३५५ एवढी आहे. यामध्ये दुबार, मृत अथवा कायमस्वरूपी स्थलांतरित अशा ६ हजार १०७ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.

१८ वर्षे पूर्ण झाली, नोंदणी केली का? येत्या ५ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीसाठी पात्र ठरणाऱ्या वयाची १८ वर्षे पूर्ण न झालेल्या युवकांना मतदार नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे.

८००० मतदारांची भरया प्रारूप मतदार यादीतील एकूण मतदारांची संख्या २४ लाख ५० हजार ३५५ एवढी आहे. यामध्ये ८ हजार ९२० इतकी नवीन मतदार नोंदणी आहे.

प्रारूप मतदार यादी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या मतदार यादीचे अवलोकन करून दावे व हरकती असल्यास विहित अर्ज नमुना क्रमांक सहा व आठ भरून विधानसभा मतदारसंघामध्ये नोंदवाव्यात, असे आवाहन  जिल्हाधिकारी कार्यालयाने केले.

टॅग्स :निवडणूकमुंबई