आता धुरांचा रेषा हवेत निघणार नाहीत! कोकण रेल्वे मार्गावर आता सहा गाड्या विजेवर धावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 07:33 AM2022-11-09T07:33:04+5:302022-11-09T07:33:46+5:30

कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचे शंभर टक्के काम पूर्ण झाले आहे.

Six trains will now run on electricity on the Konkan railway line | आता धुरांचा रेषा हवेत निघणार नाहीत! कोकण रेल्वे मार्गावर आता सहा गाड्या विजेवर धावणार

आता धुरांचा रेषा हवेत निघणार नाहीत! कोकण रेल्वे मार्गावर आता सहा गाड्या विजेवर धावणार

Next

नवी मुंबई :

कोकण रेल्वेमार्गाचे शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने सर्व गाड्या इलेक्ट्रिक ट्रॅक्शनसह अर्थात विजेवर चालविण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. सध्या सहा मार्गांवरील गाड्या विजेवर धावणार आहेत. ८ नोव्हेंबरपासून या नव्या सुविधेचा प्रारंभ करण्यात आला आहे. 

इंदूर ते कोचुवेली ही साप्ताहिक एक्स्प्रेस ८ नोव्हेंबरपासून विजेवर धावणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई सीएसएमटी-मडगाव जंक्शन-सीएसएमटी ही जनशताब्दी ९ नोव्हेंबरपासून विजेवर धावणार आहे. कोचुवेली ते इंदूर साप्ताहिक एक्स्प्रेस ११ नोव्हेंबरपासून,  भावनगर ते कोचुवेली साप्ताहिक एक्स्प्रेस गाडी १५ नोव्हेंबर, तर कोचुवेली ते भावनगर साप्ताहिक गाडी १७ नोव्हेंबरपासून विजेवर धावणार आहेत. कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचे शंभर टक्के काम पूर्ण झाले आहे.

आता कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या इलेक्ट्रिकल ट्रॅक्शन अर्थात विजेवर चालविण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने केली जात आहे. त्यानुसार अनेक मार्गांवरील गाड्या विजेवर धावत आहेत. या प्रक्रियेचाच एक भाग म्हणून ८ नोव्हेंबरपासून सहा मार्गावरील गाड्या विजेवर चालविण्याचा निर्णय घेतल्याचे कोकण रेल्वेेचे उपमहाप्रबंधक तथा जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Six trains will now run on electricity on the Konkan railway line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे