Join us

क्रूझ शिपवर नोकरीच्या आमिषाने राज्यातील ६ बेरोजगारांना लाखोंचा गंडा

By admin | Published: November 24, 2014 1:08 AM

५ बेरोजगारांना लाखोंचा गंडा घालणा-या ठाण्यातील महिलेविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे

ठाणे - प्रिन्सेस यूएसए या कंपनीच्या क्रूझ शिपवर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ठाण्यासह नाशिक, सोलापूर आणि कर्नाटक येथील ५ बेरोजगारांना लाखोंचा गंडा घालणा-या ठाण्यातील महिलेविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.चेंदणी कोळीवाडा येथील कुणाल दाभाडे या बेरोजगार तरुणाने सुप्रिया नायर ऊर्फ भार्गव या महिलेविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत तिने मार्च २०१४ ते आतापर्यंत एकूण ५ जणांना नोकरी लावते, असे सांगून रोख व चेकद्वारे एकूण ६ लाख १० हजार रुपये घेतले आहेत. मात्र, अद्याप एकालाही नोकरी लावलेली नाही. माझ्यासह नाशिकच्या विलास पवार आणि पवन देवरे यांच्याकडून प्रति एक लाख, सोलापूरच्या नाना डोंबाळे आणि कर्नाटकच्या विनोद कोलवेकर या दोघांकडून प्रत्येकी ८० हजार तसेच मुंबईतील पंकज कांबळेकडून दीड लाख रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)