कौशल्य विकास हाच बलशाली देशासाठी मंत्र

By admin | Published: April 17, 2016 02:07 AM2016-04-17T02:07:24+5:302016-04-17T02:07:24+5:30

‘देशातील तरुणांची शक्ती भारताच्या विकासासाठी उपयोगात आणण्याची नितांत आवश्यकता असून, बलाशाली देशासाठी ‘कौशल्य विकास’ हाच यापुढील काळात मुख्य मंत्र असेल,’ असे प्रतिपादन

Skill development is the mantra for a strong country | कौशल्य विकास हाच बलशाली देशासाठी मंत्र

कौशल्य विकास हाच बलशाली देशासाठी मंत्र

Next

मुंबई : ‘देशातील तरुणांची शक्ती भारताच्या विकासासाठी उपयोगात आणण्याची नितांत आवश्यकता असून, बलाशाली देशासाठी ‘कौशल्य विकास’ हाच यापुढील काळात मुख्य मंत्र असेल,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
विलेपार्ले येथील नरसी मोनजी इन्स्टिट्युट आॅफ मॅनेजमेंट स्टडिज या अभिमत विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. चीनला ‘जगाचा कारखाना’ असे संबोधले जाते. आता परिस्थिती बदलली आहे. भारताकडे ‘जगाचा कारखाना’ म्हणून आता पाहिले जाते. नेमका याच संधीचा आपण फायदा घेणे गरजेचे असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. मेक इन इंडिया, डिजिटल इंडियाच्या माध्यमातून देशाचा विकास सुरू असून, या विकास प्रक्रियेत पदवीधरांचा सहभाग महत्त्वाचा आहे. शासनाच्या कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून, त्यामुळे शासकीय कामकाजात गतिमानता आणि सुलभता आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष आणि अभिमत विद्यापीठाचे कुलपती अमरीश पटेल, उपाध्यक्ष भूपेश पटेल, कुलगुरू डॉ. राजन सक्सेना, अधिष्ठाता डॉ. देबाशिष सन्याल, कुलसचिव मीना चिंतामणी, सचिव सुनंदन दिवाटिया, सहसचिव शालिन दिवाटिया, प्रवीण गांधी, जे. पी. गांधी यांचेसह प्राध्यापक, विद्यार्थी, पालक, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Skill development is the mantra for a strong country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.