मुंबई : वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्यमींनी राज्यातील तंत्रनिकेतन विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी, तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या साहाय्याने शैक्षणिक अभ्यासक्रम तयार करावा. त्यातून वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्यनिर्मिती करावी, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.फेडरेशन आॅफ इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज या संस्थेच्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन उद्योगमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. देसाई म्हणाले की, कापूस उत्पादनात राज्य अग्रेसर आहे. मात्र, त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग राज्यात उभे राहणे आवश्यक आहे. शेती ते कापड व कापड तेफॅशन अशी व्यवस्था उभी राहिल्यास शेतकºयांना फायदा होईल. बाहेरील देशातील मोठ्या ब्रँडच्या कापडनिर्मितीत सध्या बांगलादेश, इंडोनिशिया यासारखे देशआहेत. फिक्की या क्षेत्रातहीभारतीय उद्योजकांनी पुढाकार घेतल्यास रोजगाराच्या निर्मितीमध्ये वाढ होईल.परकीय गुंतवणुकीत राज्याला पहिली पसंती देण्यात येते. देशातील एकूण गुंतवणुकीपैकी ५० टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्रात होते. इज आॅफ डुइंग बिझनेस अंतर्गतराज्यात उद्योग उभारणे सुलभ झाले आहे. राज्यात १०७ आयटीआय आहेत. यापैकी काही आयटीआयला मोठ्या उद्योगांनी दत्तक घेतले आहेत. यातील विद्यार्थ्यांना आॅटोमोबाइल इंडस्ट्रिजसाठी लागणारे कौशल्य शिकवले जाते. याच धर्तीवर वस्त्रोद्योग क्षेत्रातील संस्थांनी विद्यार्थ्यांना वस्त्रोद्योगाशी निगडित कौशल्य शिकवल्यास, कुशल मनुष्यबळ व रोजगाराच्या निर्मितीस चालना मिळेल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.
‘वस्त्रोद्योगासाठी कौशल्यनिर्मिती तंत्रनिकेतन विद्यालयातून व्हावी’ - सुभाष देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 2:50 AM