गुन्हा दाखल
भोईवाडा येथील एटीएम मशीनमध्ये स्कीमर
गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भोईवाडा येथील एटीएम मशीनमध्ये स्कीमर असल्याची बाब बँक कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे उघड होताच, भोईवाडा पोलिसांनी गुन्हा नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे.
लालबाग येथील आयडीबीआय बँकेचे जनरल मॅनेजर कुंदन नवरत्नप्रसाद कुमार (वय ४५) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३० जानेवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास सफाई कर्मचारी अभिजित जगताप हा पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेला. तेव्हा मशीनमध्ये काही तरी गडबड असल्याचा संशय आला. त्यांनी याबाबत बँक कर्मचाऱ्याला माहिती देताच, कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. तेव्हा
जेथे पासवर्ड टाईप करतात त्याठिकाणी एक स्कीमर मशीन लावल्याचे निदर्शनास आले. स्कीमर
मशीन ताब्यात घेत, एटीएम मशीन टेक्निशियनकडून मशीनची पूर्ण पाहणी करून घेतली. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याच दिवशी सकाळी ७ वाजता अज्ञात इसम पैसे काढण्याव्यतिरिक्त तेथे स्कीमर मशीन लावत असल्याचे दिसून आले. त्यानुसार त्यांनी भोईवाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलीस अधिक तपास करत आहेत.