‘जीएसटीतून सॅनिटरी नॅपकिन्स वगळा’
By admin | Published: May 24, 2017 03:11 AM2017-05-24T03:11:11+5:302017-05-24T03:11:11+5:30
राज्यात १ जुलैपासून लागू होणाऱ्या वस्तू सेवा कर (जीएसटी) मधून सॅनिटरी नॅपकिन्स, सॅनिटरी डायपर्सना वगळण्यात यावे,
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात १ जुलैपासून लागू होणाऱ्या वस्तू सेवा कर (जीएसटी) मधून सॅनिटरी नॅपकिन्स, सॅनिटरी डायपर्सना वगळण्यात यावे, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आले. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिला.
जीएसटीमधून बांगड्या, कुंकू, टिकल्या आदी वस्तू वगळल्या असताना सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्ससाठी १२ टक्के कर लावण्यात येणार असल्याचे समजते. महिला, मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटरी नॅपकिन्सबाबत जागरूकता करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांत या मशीन्स लावल्या जात आहेत. असे असताना त्यावर जीएसटी लावणे चुकीचे आहे. त्यामुळे सॅनिटरी नॅपकिन्सला जीएसटीतून वगळावे, अन्यथा तीव्र आंदोलन पुकारले जाईल, असेही वाघ यांनी सांगितले.