Join us

स्कायवॉकला घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 6:18 AM

बेरोजगारीला कंटाळून पश्चिम बंगालच्या ३५ वर्षीय तरुणाने स्कायवॉकला अडकलेल्या केबल वायरच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी वांद्रे येथे घडली.

मुंबई : बेरोजगारीला कंटाळून पश्चिम बंगालच्या ३५ वर्षीय तरुणाने स्कायवॉकला अडकलेल्या केबल वायरच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी वांद्रे येथे घडली. शमशुद्दीन समशेर असे तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी असलेला समशेर १५ दिवसांपूर्वीच मुंबईत आला होता. वांद्रे येथे राहत असलेल्या भावाकडे तो राहण्यास होता. त्याचा भाऊ एका कारखान्यात काम करायचा. गावी काम नसल्याने समशेरने नोकरीच्या शोधात मुंबई गाठली. मात्र १५ दिवस उलटूनही नोकरी न मिळाल्याने तो निराश झाला होता. बेरोजगारीला कंटाळून त्याने वांद्रे येथील बडी मस्जिदजवळील स्कायवॉक गाठले. स्कायवॉकला लटकलेल्या केबल वायरच्या साहाय्याने मध्यरात्रीच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवारी पहाटेच्या याबाबत माहिती मिळताच वांद्रे पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. घटनास्थळावर कोणतीही सुसाइड नोट मिळाली नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश अनवकर यांनी दिली.