मुंबई : वांद्रे पूर्वेकडील शासकीय वसाहतीतील घरांची दुरवस्था झाली असून, घरातील स्लॅब कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. बुधवारी सकाळी १०.३० वाजता वसाहतीतील इमारत क्रमांक ब २९०/४ या घरामधील स्वयंपाकघरातील छताचा स्लॅब कोसळला. घरातील महिला मंगल कारवार आणि त्यांचा मुलगा या दुर्घटनेतून बचावले. मात्र, अशा दुर्घटना सातत्याने घडत असून, जीव गेल्यावर सार्वजनिक बांंधकाम विभाग दुरुस्ती करून देणार का, असा सवाल स्थानिकांनी केला आहे.‘सकाळी स्वयंपाकघरात चहा बनविताना स्लॅब कोसळला. माझ्या बाजूला स्लॅबचा भाग कोसळल्याने मी थोडक्यात बचावले. जोरदार आवाज झाल्याने हातातील चहाचा कप, पक्कड फेकून दुसऱ्या खोलीत गेले. घरामध्ये मी आणि माझा मुलगा असे दोघे होतो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाºयांनी पडलेला स्लॅब उचलला आणि काही भाग पडण्याच्या स्थितीत होता तो पाडला. मुलांना घरात एकटे सोडून जायचे म्हटले, तर खूप भीती वाटते. सार्वजनिक बांधकाम विभाग हे गांभीर्याने कधी घेणार,’ असा सवाल मंगल कारवार यांनी केला आहे.
शासकीय वसाहतीत पुन्हा स्लॅब कोसळला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 2:14 AM