Join us

केईएम हॉस्पिटलमध्ये स्लॅब कोसळला, दोन रुग्ण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 11:16 AM

मुंबई महापालिकेच्या केईएम हॉस्पिटलमध्ये बुधवारी रात्री स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे.  

मुंबई- मुंबई महापालिकेच्या केईएम हॉस्पिटलमध्ये बुधवारी रात्री स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे.  केईएम हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरील एकेडी विभागातील स्लॅब कोसळला. या अपघातात हॉस्पिटलमधील दोन रुग्ण जखमी झाले आहेत. प्लास्टर आणि एसी सिलिंग पडल्याने हा अपघात झाला. 

या अपघातात दोन रुग्ण किरकोळ जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णांसाठी आम्ही डायलेलिस विभाग दुसऱ्या ठिकाणी हलवतं आहोत. ही सेवा आजच पुन्हा सुरू केली जाईल. तसंच पुढील तीन ते चार दिवसात आधीच्याच ठिकाणी विभाग पुन्हा सुरू केला जाईल, अशी माहिती केईएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी दिली आहे.  

केईएम हॉस्पिटल मुंबईतील सर्वात मोठं शासकीय हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. रुग्ण व त्यांचे कुटुंबीय अशी हजारोंची वर्दळ रोज हॉस्पिटलमध्ये असते