स्लॅब कोसळून दोन ठार!

By admin | Published: March 29, 2015 12:10 AM2015-03-29T00:10:19+5:302015-03-29T00:10:19+5:30

घाटकोपर पंतनगर परिसरातील आठ मजली बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून दोन मजूर जागीच ठार झाले. तर अन्य दोघे गंभीररित्या जखमी झाले.

Slab collapses killing two! | स्लॅब कोसळून दोन ठार!

स्लॅब कोसळून दोन ठार!

Next

मुंबई : घाटकोपर पंतनगर परिसरातील आठ मजली बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून दोन मजूर जागीच ठार झाले. तर अन्य दोघे गंभीररित्या जखमी झाले. हा अपघात शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास घडला. जखमींवर राजावाडी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
घाटकोपर पूर्वेकडील लक्ष्मीनगर येथील एव्हरेस्ट गार्डन परिसरालगत नालंदा एन एक्स नामे आठ मजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. संध्याकाळी पाचच्या सुमारास आठव्या मजल्यावरील गॅलरीचा स्लॅब कोसळला. कोसळलेला भाग खाली काम करणाऱ्या चार मजुरांवर पडला. त्यापैकी बुधराम नाग(२५) आणि अशोक अवम(४०) हे दोन मजूर जागीच ठार झाले. तर अन्य दोघे गंभीररित्या जखमी झाले.
बांधकाम करणाऱ्या बिल्डरने मजुरांच्या सुरक्षेसाठी योग्य ती खबरदारी घेतलेली नव्हती, ही बाब पंतनगर पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आल्याचे समजते. त्यानुसार ठेकेदार आणि विकासकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहीती वरिष्ठ निरिक्षक शंकर धनावडे यांनी दिली. विशेष बाब म्हणजे घटनेच्या दोन तासानंतर पोलीसांसह अग्निशमन दल आणि पालिकेच्या आपतकालीन विभागाला याची माहीती मिळाली.

Web Title: Slab collapses killing two!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.