यशवंत नाट्यगृहातील जिन्यावर सरकत्या खुर्चीची सोय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 03:05 PM2024-06-20T15:05:03+5:302024-06-20T15:05:35+5:30

ज्येष्ठ नाट्यरसिकांना होणार विशेष सुविधेचा फायदा

Sliding chair facility on staircase in Yashwant Theater | यशवंत नाट्यगृहातील जिन्यावर सरकत्या खुर्चीची सोय

यशवंत नाट्यगृहातील जिन्यावर सरकत्या खुर्चीची सोय

मुंबई - आवड असूनही वयोमानामुळे आणि शारीरिक व्याधींमुळे प्रयोगाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागणाऱ्या ज्येष्ठ नाट्य रसिकांच्या सोयीसाठी अखिल भारतीय नाट्यपरिषदेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नूतनीकरणानंतर नाट्यरसिकांसाठी २२ जूनपासून  खुल्या होणाऱ्या माटुंग्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात अखिल भारतीय नाट्यपरिषदेतर्फे एका विशेष सुविधेची व्यवस्था ज्येष्ठ नाट्यरसिकांसाठी करण्यात आली आहे.

ज्येष्ठ नाट्यरसिकांच्या सोयीसाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेने जिन्यावर सरकत्या खुर्चीची सोय केली आहे. या सुविधेचा फायदा नाटक बघण्यासाठी इच्छुक ज्येष्ठ रसिकांना होणार आहे. जिने चढणे शक्य नसलेल्या रसिकांना या  सरकत्या खुर्चीच्या मदतीने पहिल्या माळ्यावर सहजरित्या पोहचता येणार आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल हे महाराष्ट्रातील पहिले नाट्यगृह बनले आहे, जिथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 

रसिकांच्या आवडीचे आणि हक्काचे नाट्यगृह असणारे यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलाचा बदलता चेहरामोहरा नाट्यरसिकांना  सुखावणारा असून, अखिल भारतीय नाट्यपरिषदेने सुरु केलेल्या या सुविधेचा अधिक फायदा होणार आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलाप्रमाणे अन्य नाट्यगृहात ही सुविधा सुरु करण्याचा मानस नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी व्यक्त केला आहे. नाट्यरसिकांमध्ये ज्येष्ठ नाट्यरसिकांची संख्या अधिक असते. वयोमानानुसार शारीरिक अडचणींमुळे त्यांना चांगल्या नाटकाला मुकावे लागू नये यासाठी आम्ही हे पाऊल  उचलले असल्याचे दामले यांनी सांगितले.

Web Title: Sliding chair facility on staircase in Yashwant Theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई