लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने सलग चौथ्या दिवशी आठ हजारांचा टप्पा पार केला आहे. मुंबईत मात्र गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. शनिवारी दिवसभरात मुंबईत ९८७ नवे रुग्ण आढळून आले असून ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी २४९ दिवस इतका आहे. राज्यात शनिवारी ८,६२३ नवीन रुग्णांचे निदान झाले, तर ५१ कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. राज्यातील रुग्णांची एकूण संख्या २१,४६,७७७ झाली असून, मृतांचा आकडा ५२ हजार ९२ झाला आहे. सध्या राज्यात ७२,५३० रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यात दिवसभरात ३,६४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. दिवसभरातील एकूण ५१ मृत्यूंपैकी २७ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर १९ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ५ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
राज्याचा आकडा सलग चौथ्या दिवशी आठ हजारांपारराज्यात एकूण २०,२०,९५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.१४ टक्के तर आता मृत्युदर २.४३ टक्के आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६१,९९,८१८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.२५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.