Join us

राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत तसेच मृत्यूंत काहीशी घट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 2:12 AM

दिवसभरात ५६ हजार ६४७ रुग्ण, ६६९ मृत्यू

मुंबई : राज्यात रविवारी दैनंदिन रुग्णसंख्येत आणि मृत्यूंत काहीशी घट झाल्याचे दिसून आले. दिवसभरात ५६ हजार ६४७ रुग्ण आणि ६६९ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ४७ हजार २२ हजार ४०१ झाली असून बळींचा आकडा ७० हजार २८४ झाला आहे. सध्या राज्यात ६ लाख ६८ हजार ३५३ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आऱोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात दिवसभरात ५१ हजर ३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ३९ लाख ८१ हजार ६५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आता राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.३१ टक्के झाले असून मृत्यूदर १.४९ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ७६ लाख ५२ हजार ७५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७.०८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३९ लाख ९६ हजार ९४६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर २७ हजार ७३५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दिवसभरात नोंद झालेल्या ६६९ मृत्यूंपैकी ३५० मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर १५३ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १६६ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहे. या ६६९ मृत्यूंमध्ये मुंबई ७९, ठाणे ८, ठाणे मनपा १२, नवी मुंबई मनपा १०, कल्याण डोंबिवली मनपा ३०, भिवंडी निजामपूर मनपा २, वसई विरार मनपा ४, रायगड ३, पनवेल मनपा ८, नाशिक १९, नाशिक मनपा १६, अहमदनगर २०, अहमदनगर मनपा १४, जळगाव १५, जळगाव मनपा ६, नंदूरबार २, पुणे ९, पुणे मनपा ५३, पिंपरी चिंचवड मनपा ३, सोलापूर १९, सोलापूर मनपा ३०, सातारा १५, कोल्हापूर ४, सांगली २५, सांगली मिरज कुपवाड मनपा १, सिंधुदुर्ग १०, औरंगाबाद मनपा २, जालना १०, हिंगोली ११, परभणी ५, परभणी मनपा ८, उस्मानाबाद २२, बीज १६, नांदेड १३, नांदेड मनपा १०, अकोला १, अकोला मनपा ३, अमरावती १६, अमरावती मनपा ५, यवतमाळ २८, वाशिम १०, नागपूर ५, नागपूर मनपा २५, वर्धा ६, भंडारा ९, गोंदिया ५, चंद्रपूर १०, चंद्रपूर मनपा ५. इ. रुग्णांचा समावेश आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यानिवडणूक