मोबाइल तिकिटाच्या वापरात अल्प वाढ
By Admin | Published: February 21, 2017 07:01 AM2017-02-21T07:01:31+5:302017-02-21T07:02:57+5:30
तिकीट खिडक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी मोबाइल तिकीट सुविधा रेल्वेकडून सुरू करण्यात आली. सुरुवातीला मिळालेल्या
मुंबई : तिकीट खिडक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी मोबाइल तिकीट सुविधा रेल्वेकडून सुरू करण्यात आली. सुरुवातीला
मिळालेल्या प्रतिसादानंतर अजून त्यात वाढ झालेली नाही. या सेवेत वाढ व्हावी, म्हणून काही दिवसांपूर्वी प्रिंटचा पर्याय देण्यात
आला. त्यानंतर, या सेवेत अल्प प्रमाणात वाढल्याचे निदर्शनास आले आहे. रेल्वेकडून वर्षभरापूर्वी मोबाइल तिकीट सेवा सुरू करण्यात आली. या सेवेत प्रिंट काढण्याचा पर्याय देण्यात आला होता, परंतु हा पर्याय बंद करून पेपरलेस मोबाइल तिकीट देण्यास सुरुवात झाली. त्याला प्रवाशांचा कमी प्रतिसाद मिळाल्यानंतर, पुन्हा एकदा प्रिंटचा पर्याय या सेवेत देण्यात आला. सुरुवातीला मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर तीन ते चार हजार तिकिटे मोबाइल तिकीट सेवेतून काढली जात होती. परंतु प्रिंटची सेवा देण्यात आल्यानंतर, आता मध्य रेल्वे मार्गावर दररोज ३,५०० आणि पश्चिम रेल्वे मार्गावर अडीच हजार तिकिटे काढली जातात. या संदर्भात (क्रिसचे मुंबई विभाग) उदय बोभाटे यांनी सांगितले की, प्रिंटचा पर्याय देण्यात आल्यानंतर, तिकीट विक्रीत हळूहळू वाढ होत आहे. प्रवाशांच्या दृष्टीने यात आणखी काही बदल केले जाऊ शकतात का, याचीही पडताळणी करत आहोत. नोटाबंदीनंतर दोन खासगी ई-वॉलेट कंपन्यांचाही पर्याय देण्यात आला आहे. दिवसाला दीडशे ते दोनशे तिकिटे काढली जात आहेत. (प्रतिनिधी)